महापूरप्रश्नी अभ्यास गटाची स्थापना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:24 IST2021-09-19T04:24:55+5:302021-09-19T04:24:55+5:30

कोल्हापूर : इंजिनिअर्स डेच्या निमित्ताने असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्सतर्फे महापूरप्रश्नी अभ्यास गट स्थापना करण्यात आला. असोसिएशनच्या कार्यालयात अभ्यास ...

Establishment of Mahapurprashni study group | महापूरप्रश्नी अभ्यास गटाची स्थापना

महापूरप्रश्नी अभ्यास गटाची स्थापना

कोल्हापूर : इंजिनिअर्स डेच्या निमित्ताने असोसिएशन ऑफ आर्किटेक्टस अँड इंजिनिअर्सतर्फे महापूरप्रश्नी अभ्यास गट स्थापना करण्यात आला. असोसिएशनच्या कार्यालयात अभ्यास गटाची पहिली बैठक झाली.

बैठकीस शिवाजी विद्यापीठ भूगोल विभागप्रमुख सचिन पन्हाळकर, प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयकुमार चव्हाण, नगररचना उपसंचालक धनंजय खोत, पाटबंधारे विभागाचे अधिकारी मनोज पारकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनाईक, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, केआयटीचे सिव्हिल विभागप्रमुख मोहन चव्हाण, प्रा. शीतल वरुर, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेजचे मिलिंद पाटील, अभय जोशी, प्राचार्य विनय शिंदे, प्रा. संदीप घाटगे उपस्थित होते.

यावेळी असोसिएशनचे अध्यक्ष अजय कोराणे यांनी महापूर अभ्यास गट स्थापन करण्याचा हेतू स्पष्ट केला. असोसिएशनचे उपाध्यक्ष विजय चोपदार, सचिव राज डोंगळे, संचालक जयंत बेगमपुरे, अनिल घाटगे, डॉ. विजय पाटील, प्रमोद पवार, अंजली जाधव, प्रशांत काटे, उमेश कुंभार, उदय निचिते, निशांत पाटील उपस्थित होते.

Web Title: Establishment of Mahapurprashni study group

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.