शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

सीपीआर घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 14:32 IST

कोल्हापूर येथील सीपीआरमधील ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांनी दिली.

ठळक मुद्देसीपीआर घटनेच्या चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापनडॉ. बी. वाय.माळी अध्यक्ष, वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांची माहिती

कोल्हापूर : येथील सीपीआरमधील ट्रॉमा आयसीयूमधील एका कक्षात इलेक्ट्रिक बोर्डमध्ये शॉट सर्कीट होवून झालेल्या दुर्घटनेच्या चौकशीसाठी डॉ. बी. वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. राहूल बडे यांनी दिली.डॉ. बडे यांनी दिलेलय प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे, ट्रॉमा आयसीयूमध्ये एकूण 15 रुग्ण दाखल होते. त्यापैकी आगीची घटना घडलेल्या कक्षात चार रुग्ण होते. सेवेवर असलेले डॉक्टर्स, नर्सेस, वर्ग चार कर्मचारी आणि महाराष्ट्र सुरक्षा बल यांचे सुरक्षा रक्षक यांनी प्रसंगावधान राखून कोरोनाची पर्वा न करता जीवाची बाजी लावून धाडसाने अत्यंत थोड्या वेळात येथील एकूण सर्व 15 रुग्ण अन्य कक्षामध्ये स्थलांतरित केले. या दरम्यान कोणत्याही रुग्णास कुठल्याही प्रकारची दुखापत किंवा जिवीत हानी झाली नाही.ट्रॉमा आयसीयूमधील तीन कक्षामध्ये एकूण 15 रुग्णांपैकी 9 रुग्ण हे एन.आय.व्ही.वर होते. उर्वरित रुग्णांना मास्कद्वारे ऑक्सिजन पुरविण्यात येत होता. रुग्ण स्थलांतर दरम्यान योग्य काळजी घेवून इतर आयसीयूमध्ये स्थलांतरित केले. स्थलांतरित केलेल्या रुग्णांना आयसीयूमध्ये योग्य उपचार तातडीने दिले.

उपचार सुरु असताना काही काळानंतर जे रुग्ण अती गंभिर होते त्यापैकी तीन रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यामध्ये ट्रॉमा आयसीयूमधील घटना घडलेल्या कक्षातील एक व इतर कक्षातील दोन असे एकूण तीन अतिगंभीर रुग्णांचा समावेश आहे. हे रुग्ण दाखल झाल्यापासून अतिगंभीर होते व त्याबाबत संबंधित रुग्णांच्या नातेवाईकांना वेळोवेळी कल्पना देण्यात आली होती.मृत्यू झालेल्या तीनही रुग्णांच्या फुफूसामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग असल्याचे दिसून आले होते. तसेच एन.आय.व्ही. असताना सुध्दा त्यांचे ऑक्सिजनचे प्रमाण कमी राहत होते. त्यांना इतर व्याधीग्रस्त जसे उच्च रक्तदाब अशा प्रकारचे आजार होते. उर्वरित रुग्णांचे उपचार आयसीयूकक्षामध्ये सुरु असून रुग्ण स्थिर आहेत.या प्रकरणाची चौकशी करण्याकरीता डॉ. बी.वाय. माळी यांच्या अध्यक्षतेखाली सात सदस्यीय उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे.

टॅग्स :CPR Hospitalछत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयfireआगkolhapurकोल्हापूर