दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात लसीकरण केंद्र उभारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:24 IST2021-04-28T04:24:52+5:302021-04-28T04:24:52+5:30
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता येणाऱ्या काळात प्रत्येक व्यक्तीला लस उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक ...

दक्षिण मतदारसंघातील प्रत्येक गावात लसीकरण केंद्र उभारा
जिल्ह्यातील कोरोनाची वाढती रुग्णसंख्या विचारात घेता येणाऱ्या काळात प्रत्येक व्यक्तीला लस उपलब्ध करून देण्यासाठी कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार बूथनिहाय लसीकरण केंद्रे उभारावीत अशी मागणी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.
निवेदनात म्हटले आहे की, कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या दहा दिवसांत कोरोनाचा उद्रेक दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात कोरोनापासून बचाव करण्यासाठी सर्वांना लसीची आवश्यकता लागणार आहे. प्रत्येक भागात पोलिओ लसीकरण ज्याप्रमाणे केले जाते, त्याप्रमाणे दक्षिण विधानसभा मतदारसंघातील ३६ गावांमध्ये मतदार बूथनिहाय लसीकरण केंद्र सुरू करावेत.
फोटो : २७ पाचगाव विराज पाटील
ओळ :
कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मतदार बूथनिहाय लसीकरण केंद्रे उभारा, अशी मागणी शिवसेना करवीर तालुकाप्रमुख विराज पाटील यांनी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.