वडगावात अत्यावश्यक सेवा दुपारपर्यंत बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2021 04:16 IST2021-06-11T04:16:26+5:302021-06-11T04:16:26+5:30
पेठवडगाव : अत्यावश्यक सेवेसोबत अन्य व्यवसाय सुरू करावेत यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापारी असोसिएशनसह सर्व ...

वडगावात अत्यावश्यक सेवा दुपारपर्यंत बंद
पेठवडगाव : अत्यावश्यक सेवेसोबत अन्य व्यवसाय सुरू करावेत यासाठी कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सच्या आवाहनास प्रतिसाद देत व्यापारी असोसिएशनसह सर्व असोसिएशनने गुरुवारी दुपार बारापर्यंत सर्व बाजारपेठ बंद ठेवली. कोरोना महामारीत अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय सुरू आहेत. उर्वरित व्यापाऱ्यांचे व्यवसाय ठप्प झाले आहेत. शासकीय पातळी त्यांना दुर्लक्षित करून विविध कर, विद्युत बिले, कर्ज हप्ते, शैक्षणिक फी, संसारी जबाबदारी यामुळे हे व्यापारी मेटाकुटीस आले आहेत. त्यामुळे ढासळलेल्या व्यापाऱ्यांना मदतीची आवश्यकता असताना, व्यवसाय बंद असताना जाचक करांची आकारणी सुरू आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी व उर्वरित व्यवसाय सुरू करावेत या मागणीसाठी चेंबर ऑफ कॉमर्स कोल्हापूरच्या वतीने अत्यावश्यक सेवेतील व्यवसाय गुरुवारी दुपारपर्यंत कडकडीत बंद ठेवण्याचे आवाहन केले होते. त्यास व्यापारी असोसिएशन यांनी पाठिंबा दिला. यास धान्य, किराणा, कापड, मेडिकल व्यापाऱ्यानी सशर्त पाठिंबा दिला. व्यापाऱ्यांनी दुकानाच्या बाहेर उभा राहून शासनाच्या एकतर्फी आणि अन्यायी धोरणाचा निषेध केला. यावेळी वाणी पेठेत नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी नगराध्यक्ष माळी, माजी नगराध्यक्ष अभिजित पोळ, गणेश पिसे, शैलेश शहा, योगेश हुक्केरी, उदय कोरे, प्रवीण दुर्गुळे, रोहित माळी, विपूल वडगावे, मनोज शहा, संतोष लडगे, विजय झगडे, मयूर बुकशेट आदी उपस्थित होते.
पेठवडगाव: बंद असलेली दुकाने सुरू करावीत, अशी मागणी पेठवडगाव व्यापारी असोसिएशनसह विविध संघटनाच्यावतीने नगराध्यक्ष मोहनलाल माळी यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.