फरास कुटुंबीयांतर्फे ७०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:25 IST2021-05-18T04:25:50+5:302021-05-18T04:25:50+5:30

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील व्यवसाय बंद असल्याने तसेच रविवारपासून कडकडीत लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांची ...

Essential materials for 700 families by Faras family | फरास कुटुंबीयांतर्फे ७०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

फरास कुटुंबीयांतर्फे ७०० कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य

कोल्हापूर : गेल्या काही दिवसांपासून शहरातील व्यवसाय बंद असल्याने तसेच रविवारपासून कडकडीत लॉकडाऊन जाहीर झाल्यामुळे हातावरचे पोट असलेल्या कुटुंबांची चांगलीच गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सामाजिक कार्यात पुढे असणाऱ्या फरास कुटुंबीयांनी सोमवारी तृतियपंथींना जीवनावश्यक वस्तूंचे किट देण्यात आले. याशिवाय अन्य ७०० गरीब कुटुंबीयांना एक महिन्याचे जीवनावश्यक साहित्य दिले.

शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने जिल्हा प्रशासनाने कडकडीत बंद केले आहे. कोरोनाला हरवण्यासाठी कडकडीत बंद करणे गरजेचे आहे; पण यामुळे हातावर पोट असणाऱ्या मजूर, कामगार, रिक्षाचालक, मिस्त्री अशा बहुसंख्य नागरिकांचे मात्र हाल होत आहेत. असाच एक घटक जो नेहमी समाजाच्या मुख्य प्रवाहातून लांब असतो तो म्हणजे तृतीयपंथी. त्यांच्या अडचणी समजावून घेत स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांनी मदतीसाठी पुढाकार घेतला. यावेळी धान्य व इतर आवश्यक गोष्टीचे किट माजी महापौर हसीना फरास, श्रुतिका लॅबचे डॉ. श्रीकांत चिंचणीकर व वसीम फरास यांच्या हस्ते वाटप करण्यात आले.

कोल्हापुरातील नागरिक नेहमीच आपल्या मोठ्या मनासाठी ओळखले जातात. गेल्या वर्षी प्रमाणे यावेळी ही दानशूर नागरिकांनी पुढे येऊन समाजातील गरजवंत नागरिकांना मदत करावी, असे आवाहन आदिल फरास यांनी केले.

फोटो क्रमांक - १७०५२०२१-कोल-फरास फॅमिली

ओळ - कोल्हापूरच्या माजी महापौर हसिना फरास व स्थायी समितीचे माजी सभापती आदिल फरास यांच्यावतीने तृतियपंथीयांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Web Title: Essential materials for 700 families by Faras family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.