शहरं
Join us  
Trending Stories
1
GenZ पिढीच्या मुलांवर माझा विश्वास, हीच मुलं भारताला 'विकसित राष्ट्र' बनवतील- पंतप्रधान मोदी
2
४५ वर्षाचा गड कोसळला, भाजपानं रचला इतिहास; १ मत फिरवलं अन् 'या' महापालिकेत बसवला महापौर
3
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
4
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
5
'लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात, पण जगताप यांनी वैचारिक लढ्यासाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला', हर्षवर्धन सपकाळ यांनी केलं कौतुक 
6
सिंह राशीसाठी नवीन वर्ष 2026 स्वप्नपूर्तीचे वर्ष; आश्चर्याचे धक्के आणि परदेश प्रवासाचे योग!
7
नगरसेविकेच्या पतीच्या हत्येनंतर खोपोलीत पोलीस ठाण्याला घेराव, पोलीस निरीक्षकावर गंभीर आरोप, मागणी काय?
8
अदानी ग्रुपकडून मिळाली ₹3400 कोटींची ऑर्डर, झटक्यात ५% नं वधारला शेअर; आता खरेदीसाठी उडाली लोकांची झुंबड
9
गणपती बाप्पा सांताक्लॉजच्या वेशात? जाहिरातीवर मनसेचा संताप; केंद्र सरकारवर केली टीका!
10
गृहकर्जाचा हप्ता वाढलाय? 'लोन ट्रान्सफर'ने वाचवा लाखो रुपये; कमी व्याजासाठी बँक कशी बदलावी?
11
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
12
बापरे! हिवाळ्यात 'या' छोट्या चुकांमुळे वेगाने गळू लागतात केस, टक्कल पडण्याची वाटते भीती
13
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
14
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
15
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
16
अबरारची दहशत अन् रहमान डकैतचा स्वॅग! पडद्यावरच्या 'बॅड बॉईज'ने कशी लुटली लाइमलाइट?
17
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
18
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
19
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
20
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur News: दाजीपूर अभयारण्यात ३०, ३१ डिसेंबरला प्रवेशबंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 12:05 IST

नववर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे

राधानगरी : सरत्या वर्षाला निरोप देताना पाश्चात्य संस्कृतीचे अनुकरण करत अतिउत्साही युवा पिढी ३१ डिसेंबर साजरा करताना दिसते. शहरी भागातील हे फॅड ग्रामीण भागातही चांगलेच रुजले आहे. हे करीत असताना अनेकदा अनुचित प्रकार घडतात. हे अनुचित प्रकार टाळण्यासाठी ३० व ३१ डिसेंबरला राधानगरी दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात पर्यटकांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.३१ डिसेंबरच्या नावाखाली राधानगरी, दाजीपूर अभयारण्य परिसरात चुली मांडून जेवणावळी करून नशेत गाण्याच्या ठेक्यावर थिरकणारी तरुण पिढी मोठ्या प्रमाणात आहे. नववर्षाचे स्वागत करताना पर्यावरणाचे भान ठेवणे गरजेचे आहे.येथील विपुल वनसंपदा जपणे काळाची गरज आहे. शहरी पर्यटक तसेच काही हौशी लोकांकडून दाजीपूर अभयारण्य क्षेत्रात विनापरवाना प्रवेश करून पत्रावळ्या, प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, काचा फोडणे, कचरा करणे, जंगलामध्ये वणवा लावणे, शिकार करणे असे अनधिकृत प्रकार घडू शकतात. काही हुल्लडबाज तरुणाईच्या असल्या कृत्यामुळे येथील पर्यटनाला खीळ बसते. असे प्रकार टाळण्यासाठी वनविभागाकडून प्रत्येक वर्षी डिसेंबरअखेर दोन दिवस दाजीपूर अभयरण्यात प्रवेश बंद केला जातो. ३५१ चौरस किमी पसरलेला स्वर्गाहून सुंदर दाजीपूर अभरण्याच्या परिसरातील देवराई, बॅकवॉटर आणि पश्चिम घाटात आढळणाऱ्या दुर्मीळ रानभाज्या आणि औषधी वनस्पतींचे जतन, संरक्षण आणि संवर्धन केल्यास खऱ्या अर्थाने नववर्षाचे स्वागत होईल, असा विश्वास पर्यावरणप्रेमींतून व्यक्त होत आहे.

३० व ३१ डिसेंबर हे दोन दिवस दाजीपूर अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येत असून, अभयरण्य क्षेत्रात अनुचित प्रकार घडल्यास कारवाई करण्यात येईल. - आर. डी. घुणकीकर, परिक्षेत्र वन अधिकारी, दाजीपूर.

English
हिंदी सारांश
Web Title : Dajipur Sanctuary Closed to Visitors December 30-31 for Safety

Web Summary : To prevent disturbances and protect the environment, Dajipur Sanctuary will be closed to tourists on December 30th and 31st. Authorities aim to curb unauthorized activities during New Year celebrations, preserving the sanctuary's biodiversity and preventing littering and potential forest fires.