उपक्रमशील शिक्षकांनाच यापुढे राज्य पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:04+5:302021-01-17T04:22:04+5:30

कोल्हापूर : फाईलने नाही, ऑनलाईन येणारे आणि चांगले उपक्रम राबवलेल्यांनाच यापुढे राज्य शासनाचे शिक्षक पुरस्कार दिले जातील, असे शालेय ...

Entrepreneurial teachers no longer receive state awards | उपक्रमशील शिक्षकांनाच यापुढे राज्य पुरस्कार

उपक्रमशील शिक्षकांनाच यापुढे राज्य पुरस्कार

कोल्हापूर : फाईलने नाही, ऑनलाईन येणारे आणि चांगले उपक्रम राबवलेल्यांनाच यापुढे राज्य शासनाचे शिक्षक पुरस्कार दिले जातील, असे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले.

खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीच्यावतीने शनिवारी शिक्षण जागर पुरस्काराचे वितरण झाले. यावेळी त्या बोलत होत्या. पालकमंत्री सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी गेल्या वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या २० शिक्षकांचा सत्कार झाला. शालेय शिक्षणाच्या माध्यमातून गुणवत्तापूर्ण शिक्षण पोहोचवण्याचे काम शिक्षकांनी करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

मंत्री गायकवाड म्हणाल्या, कोरोनामुळे राज्य शासनासमोर आर्थिक आणि आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. संकटकाळात शिक्षकांनी चांगले काम केले आहे. त्यांनी पटसंख्या किती वाढवली व विविध उपक्रम किती राबवले याची नोंद घेऊनच पुरस्कारासाठी निवड केली जाईल. अशा पुरस्कार विजेत्याला विदेशात पाठवू व त्यांनी जगभरात शिक्षणातील प्रयोगांचा अभ्यास करावा व त्याचा लाभ राज्यातील विद्यार्थ्यांना मिळवून देण्याचा प्रयत्न आहे.

यावेळी सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे, आमदार प्रा. जयंत आसगांवकर यांनी मनोगत व्यक्त केले. आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, माजी महापौर निलोफर आजरेकर, आनंदा हिरुगडे, शिवाजी भोसले, नंदिनी पाटील, आदी उपस्थित होते.

चौकट

गायकवाड म्हणाल्या,

केंद्र शासनाच्या नवीन धोरणात चांगले जे असेल ते स्वीकारले जाईल. चुकीच्या गोष्टींना विरोध करू

शिष्यवृत्ती वाढीच्या प्रस्तावाची अंमलबजावणी तातडीने करू

समग्र शिक्षणाच्या माध्यमातून खासगी शाळांना अनुदान देण्याचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवू

जुनी पेन्शन योजनेसाठी समिती नेमली असून अहवाल मिळताच सकारात्मक निर्णय

विनाअनुदानित शाळांचे २० टक्केचे ४० टक्के अनुदान करण्यासाठी सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये तोडगा काढू.

चौकट

केंद्र शासनाच्या नवीन शैक्षणिक धोरणामुळे अभ्यासक्रम सर्वधर्मसमभाव या तत्त्वावर होईल, याची शंका आहे. महाराष्ट्र राज्य पुरोगामी असून यामध्ये चुकीच्या गोष्टी असतील, तर राज्यात थांबवण्याची नैतिक जबाबदारी नक्कीच मंत्री गायकवाड पार पडतील, याची खात्री असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी सांगितले.

फोटो : १५०१२०२१ कोल शिक्षक पुरस्कार शाहू स्मारक न्यूज

ओळी : कोल्हापुरात खासगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती महाराष्ट्र राज्याच्यावतीने शनिवारी शिक्षण जागर पुरस्कार वितरण करण्यात आले. यावेळी शालेय शिक्षण व क्रीडामंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री सतेज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, आमदार प्रा. जयंत आसगांवकर, भरत रसाळे, माजी महापौर निलोफर आजरेकर, आदी उपस्थित होते.

Web Title: Entrepreneurial teachers no longer receive state awards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.