शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

उद्योजक संतोष शिंदे आत्महत्या प्रकरण: माझ्या नातवानं काय गुन्हा केला?, कुटुंबियांचा आक्रोश; हसन मुश्रीफही झाले निशब्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2023 15:43 IST

'बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवून संतोषकडून खंडणी वसूल करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे'

गडहिंग्लज : येथील तरुण उद्योजक संतोष शिंदे यांनी पत्नी, मुलासह आत्महत्या केली. त्यामुळे त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी आमदार हसन मुश्रीफ यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट दिली. याप्रसंगी संतोषच्या आई सुमित्रा, बहीण प्रतिभा यांनी केलेल्या आक्रोशाने आमदार मुश्रीफही नि:शब्द झाले.आमदार मुश्रीफ हे संतोष यांच्या घरी आल्याचे समजताच शहरातील विविध संघटनांच्या प्रमुखांनीही धाव घेतली. पोलिस निरीक्षक गजानन सरगरही पोहोचले. बलात्काराचा खोटा गुन्हा नोंदवून संतोषकडून खंडणी वसूल करण्यासाठी रचलेल्या कटामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व आरोपींना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी सर्वांनी केली. त्यानुसार मुश्रीफ यांनी पोलिस निरीक्षकांना सूचना दिल्या. याप्रकरणी सर्वपक्षीय शिष्टमंडळाची पालकमंत्री दीपक केसरकर यांची भेट घडविण्याची मागणी उपस्थितांनी केली. त्यानुसार मुश्रीफ यांनी पालकमंत्री केसरकर यांच्याशी मोबाइलवर संपर्क साधला. त्यांनी भेटीसाठी सोमवार (दि. २६) सकाळी साडेदहाची वेळ दिली.यावेळी माजी उपनगराध्यक्ष किरण कदम, महेश कोरी, नितीन देसाई, काँग्रेसचे बसवराज आजरी, भाजपचे चंद्रकांत सावंत, जि.प. माजी उपाध्यक्ष सतीश पाटील, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सिद्धार्थ बन्ने, संजय रोटे, दीपक कुराडे, प्रकाश पताडे, गुंड्या पाटील, महेश सलवादे, राजू जमादार, राहुल शिरकोळे उपस्थित होते.पालकमंत्री केसरकर यांची भेट घेणार आज, सोमवारी सकाळी आमदार मुश्रीफ यांच्या नेतृत्वाखाली गडहिंग्लज शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे शिष्टमंडळ कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री केसरकर यांची भेट घेणार आहे.मुश्रीफांच्या डोळ्यातही अश्रू!‘माझं पोरगं सरळ आणि प्रामाणिक होतं. आमचं कुटुंब कष्टातून उभं राहिलंय साहेब, माझ्या चिमुकल्या नातवानं काय गुन्हा केला होता हो, असं विचारत

टॅग्स :kolhapurकोल्हापूर