शिवसेनेतर्फे उद्योजक शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:25 IST2021-07-28T04:25:31+5:302021-07-28T04:25:31+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कृषी विभाग व शिवसेनेच्या वतीने ...

शिवसेनेतर्फे उद्योजक शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवाद
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी कृषी विभाग व शिवसेनेच्या वतीने कृषी महाविद्यालयात उद्योजक शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवादाचे आयोजन केले होते. यामध्ये शेतकरी, तज्ज्ञांनी यामध्ये सहभाग घेतला.
मुख्यमंत्री ठाकरे यांना निरोगी व उदंड आयुष्यासाठी सकाळी शिवसेनेच्या वतीने अंबाबाईसमोर प्रार्थना करण्यात आली. यावेळी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्यानंतर कृषी महाविद्यालयात ‘उद्योजक शेतकरी-शास्त्रज्ञ’ हा परिसंवाद आयोजित केला होता. यामध्ये शिवाजी विद्यापीठाचे वाणिज्य व मानव्यशास्त्र विभाग प्रमुख डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे, कृषी उपसंचालक भाग्यश्री फरांदे, सुजीत चव्हाण, शिवाजी जाधव, राजू जाधव, मंजित माने, अवधूत साळोखे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
फोटो ओळी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मंगळवारी शिवसेनेच्या वतीने कृषी महाविद्यालयात उद्योजक शेतकरी-शास्त्रज्ञ परिसंवादात डॉ. आण्णासाहेब गुरव यांनी मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पवार, विजय देवणे आदी उपस्थित होते. (फोटो-२७०७२०२१-कोल- संजय पवार)