शहरं
Join us  
Trending Stories
1
मग काय वाळू खाणार? आरक्षण दिले नाही तर मुंबईचा भाजीपाला, दूध बंद करू; जरांगेंचा इशारा
2
Video: अंजली कृष्णा यांच्यानंतर कारवाईला गेलेल्या महसूल अधिकाऱ्याला गावकऱ्यांकडून मारहाण
3
सावधान...! लाखात पगार असूनही ५ वर्षांपासून चुकीच्या पद्धतीने रेशन घेताय? जाणून घ्या, किती दंड भरावा लागेल?
4
Tiktok पुन्हा सुरू होणार? केंद्रीय आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी स्पष्ट केली सरकारची भूमिका
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीपूर्वीच दोन पक्षांची मोठी घोषणा; मतदानापासून दूर राहणार...! पण का...?
6
AIIMS मध्ये पहिल्यांदाच झाले गर्भदान; संशोधन आणि वैद्यकीय शिक्षणाला मिळणार नवी दिशा
7
'सत्ते पे सत्ता' अन् शुबमन गिलच्या 'बेबी' या टोपण नावामागची खास गोष्ट
8
नवा आजार चिमुकल्यांना घालतोय विळखा; Hand Foot Mouth Disease म्हणजे काय?
9
आश्चर्यच...! एका झटक्यात तब्बल ₹ 20.8 लाखांनी स्वस्त झाली 'ही' लक्झरीअस SUV, यापूर्वी असं कधीच घडलं नाही!
10
रोहित पवारांनी आरोप सिद्ध करावा, नाही तर राजकीय संन्यास घ्यावा ; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा पलटवार
11
उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांचा विजय कठीण; पण कुणाचा खेळ बिघडवणार 'क्रॉस व्होटिंग'?
12
मॉकड्रिल्स, तंत्रज्ञान असूनही कारखान्यांत स्फोट का? 'पेसो'सारख्या यंत्रणांना कार्यप्रणालीत बदल करण्याची गरज?
13
टाटा-महिंद्रासह आटो सेक्टरमध्ये मोठी वाढ! पण, आयटीतील 'या' कंपन्यांनी केली निराशा, कोण किती घसरलं?
14
पाकिस्तानच्या पावलावर पाऊल ठेवतोय बांगलादेश; IMFकडे पसरले हात, मागितले 'इतके' पैसे
15
भारत-पाक नव्हे तर श्रीलंकेच्या नावे आहे Asia Cup स्पर्धेतील हा खास रेकॉर्ड
16
रांगेत भाविकांचा छळ अन् चंद्रग्रहणात विसर्जन, लालबागचा राजा मंडळाविरोधात आता थेट CM फडणवीसांकडे तक्रार!
17
पंजाबमधील पूरपरिस्थिती पाहून सलमान खान झाला भावुक, दिला मदतीचा हात
18
एका झटक्यात स्वस्त झाली सर्वात पॉप्युलर फॅमिली कार; GST कपातीनंतर Maruti Ertiga कितीला मिळणार?
19
GST कपातीनंतर Maruti Dzire किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या नवीन किंमत...
20
"IPL सोडायला लावलं, डिप्रेशनमध्ये होतो, ढसाढसा रडलो.."; ख्रिस गेल प्रितीच्या संघावर बरसला

CoronaVirus Kolhapur updates : जिल्ह्यात आज रात्रीपासूनच प्रवेशबंदी, एक किलोमीटर अंतराबाहेर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 20:38 IST

CoronaVirus Kolhapur updates : कोल्हापूर जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरीकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व तालुकाबंदीही करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस गस्त व कारवाईच्या सुचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी दिली.

ठळक मुद्दे कोल्हापूर जिल्ह्यात आज रात्रीपासूनच जिल्हाअंतर्गत शहर, तालुकाबंदीएक किलोमीटर अंतराबाहेर आढळल्यास कारवाई

कोल्हापूर : जिल्ह्यात कोरोनाचा उद्रेक होऊ लागल्याने गुरुवारी रात्रीपासूनच नागरीकांना जिल्ह्यात प्रवेश बंदी करण्यात आली. त्याचबरोबर जिल्हाअंतर्गत शहरबंदी व तालुकाबंदीही करण्यात आली आहे. त्याच्या अंमलबजावणीसाठी पोलीस गस्त व कारवाईच्या सुचना देण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी पत्रकारांशी दिली.कोरोना संक्रमणाचा तिसरा टप्पा सुरु झाल्याने रुग्णसंख्याही झपाट्याने वाढत आहे, त्यासाठी ह्यब्रेक द चेनह्ण अतर्गत लॉकडाऊन पुकारला आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेला वगळले असले तरीही नागरीकांना जिल्हा प्रवेश बंदी व फिरण्यावर मर्यादा ठेवण्यात आल्या आहेत. पर जिल्ह्यातून येणार्या व जिल्हाबाहेर जाणाऱ्या नागरीकांवर प्रतिबंध करण्यात आला आहे.

नागरीकांना तालुक्याबाहेरही फिरता येणार नाही. तालुकास्तरावरही पोलिसांचा कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याशिवाय कोल्हापूर व इचलकरंजी शहरावर विशेष लक्ष ठेवून तेथील नागरीकांनाही एक किलोमीटर अंतराबाहेर वस्तू खरेदीसाठी आढळल्यास त्याच्यावर कारवाई होणार आहे. त्यामुळे नागरीकांनी अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन अधीक्षक बलकवडे यांनी केले.तालुका प्रवेशाला बंदीजिल्ह्यातील एका तालुक्यातून दुसर्या तालुक्यात जाण्यावर प्रतिबंध राहणार आहे. त्यासाठी तालुका तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी तसेच प्रमुख रस्त्यावर ग्रामीण व्यक्तीला येण्यासही प्रतिबंध केले आहे. त्या ठिकाणी कारवाईसाठी पोलीस बंदोबस्त राहणार आहे.एक किमी अंतराबाहेर कारवाईनागरीकांना अत्यावश्यक सुविधा ह्या एक किमी अंतरापर्यत उपलब्ध आहेत. त्याच्या कारणांस्तर एखादा व्यक्ती एक किमी अंतराबाहेर फिरताना आढळल्यास त्याच्या रहीवाशी ठिकाणाची शहानीशी करुन त्याच्यावर वाहन जप्ती, दंड, गुन्हे दाखल व जागीच ॲन्टीजेन चाचणीची कारवाई करण्यात येणार आहे.आता इव्हिनिंग वॉकवरही कारवाईपोलीस खात्यामार्फत रोज मॉर्निग वॉक साठी बाहेर पडलेल्यावर कारवाई सुरु आहे. पण आता ह्यइव्हिनिंग वॉकह्ण साठी घराबाहेर बाहेर पडलेल्या सर्वावरच कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी नागरीकांनी सायंकाळी अगर रात्री उशीराही बाहेर फिरु नये असे आवाहन पोलीस खात्यामार्फत केले आहे.अंतरजिल्हा नाकाबंदीची ठिकाणेकोल्हापूर जिल्हा प्रवेशबंदीच्या अंमलबजावणीसाठी राष्ट्रीय महामार्गावर किणी टोल नाका, कोगनोळी टोल नाका तसेच सांगली रोडवरील अंकली पूल, आंबा (ता. शाहूवाडी), शिनोळी (ता. चंदगड), राधानगरी, गवसे (आजरा) या ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी करण्यात आली आहे. प्रत्येक नाकाबंदीच्या ठिकाणी एक पोलीस अधिकारी व पोलीस कर्मचारी असतील. त्यासाठी दोन शिफ्टमध्ये पोलीस बंदोबस्ताची विभागणी केली आहे.कोल्हापूर, इचलकरंजी शहरावर विशेष लक्षकोल्हापूर शहरात नऊ तर इचलकरंजी शहरात सहा ठिकाणी कायम पोलिसांची नाकाबंदी राहणार आहे. त्याशिवाय बाजारपेठा, भाजी मार्केटच्या बाहेर पोलीसांची तपासणी पथके ठेवण्यात येत आहे. येथे वस्तू खरेदीसाठी येणारा एक किमी अंतरापेक्षा जादा दूरवरुन आल्यास त्याच्यावर कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसkolhapurकोल्हापूर