सकल मराठा समाजाने काळे कपडे परिधान करून शासनाचा केला निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:37+5:302021-05-12T04:25:37+5:30
इचलकरंजी : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील प्रांत कार्यालयासमोर मंगळवारी सकल मराठा समाजाने काळे कपडे परिधान ...

सकल मराठा समाजाने काळे कपडे परिधान करून शासनाचा केला निषेध
इचलकरंजी : मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर येथील प्रांत कार्यालयासमोर मंगळवारी सकल मराठा समाजाने काळे कपडे परिधान करून राज्य शासनाचा निषेध केला. त्याचबरोबर इतर मराठा बांधवांनी घरासमोर उभे राहून निषेध व्यक्त केला.
समाजातील प्रमुख व्यक्तींनी प्रांत कार्यालयासमोर येऊन काळ्या फिती व काळे मास्क परिधान करून आरक्षण आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं, एक मराठा-लाख मराठा अशा जोरदार घोषणा दिल्या. सर्वोच्च न्यायालयात आरक्षणाची बाजू मांडण्यात महाराष्ट्र सरकार कमी पडल्याने त्यांचा निषेध करण्यात आला. यावेळी उपमहाराष्ट्र केसरी पै. अमृत भोसले, पुंडलिक जाधव, शशिकांत मोहिते, भारत बोंगार्डे, नगरसेवक किसन शिंदे, संजय जाधव, स्वप्निल पाटील, संतोष सावंत यांच्यासह समाज बांधव सहभागी झाले होते.
फोटो ओळी
११०५२०२१-आयसीएच-०१
सकल मराठा समाजाने काळे कपडे परिधान करून शासनाचा निषेध केला.