शहरं
Join us  
Trending Stories
1
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
2
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
7
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
8
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
9
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
10
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
11
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
12
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
13
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
14
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
15
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
16
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
17
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
18
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
19
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
20
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

आख्खी कोल्हापूर जिल्हा परिषद ‘पीआरसी’च्या तयारीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 30, 2018 11:25 IST

सध्या कोल्हापूर जिल्हा परिषदेत कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे काम घेऊन गेले की ‘पंचायत राज समिती येऊन गेली की बघूया,’ हेच उत्तर ऐकायला मिळत आहे. ५, ६ आणि ७ सप्टेंबर या तीन दिवशी २८ आमदारांची ही समिती जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने हॉटेल आरक्षण आणि जेवणाचा बेत ठरविण्यासाठी आता धावपळ उडाली आहे.

ठळक मुद्देआख्खी कोल्हापूर जिल्हा परिषद ‘पीआरसी’च्या तयारीतबाकी सगळी कामे बाजूला, २८ आमदारांसह अधिकारी दौऱ्यावर

कोल्हापूर : सध्या जिल्हा परिषदेत कुठल्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडे काम घेऊन गेले की ‘पंचायत राज समिती येऊन गेली की बघूया,’ हेच उत्तर ऐकायला मिळत आहे. ५, ६ आणि ७ सप्टेंबर या तीन दिवशी २८ आमदारांची ही समिती जिल्हा दौऱ्यावर येणार असल्याने हॉटेल आरक्षण आणि जेवणाचा बेत ठरविण्यासाठी आता धावपळ उडाली आहे.तीन दिवसांसाठी येणाऱ्या या समितीसोबत मुंबईहून विधिमंडळ विभागाचे १२ अधिकारीही येणार आहेत. या सर्वांचे चालक आणि स्वीय सहायक यांचीही सोय जिल्हा परिषदेला करावी लागत आहे. त्यामुळे सध्या हीच लगबग जिल्हा परिषदेत दिसून येत आहे. ५ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते १०.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील विधानमंडळाच्या सदस्यांशी अनौपचारिक चर्चा होणार आहे. यानंतर अर्धा तास जिल्हा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा होणार आहे. या दोन्ही बैठका शासकीय विश्रामगृहावर होतील.सकाळी ११ वाजता २0१३-१४ च्या लेखापरीक्षा पुनर्विलोकन अहवालातील परिच्छेदासंदर्भात जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होईल. ६ सप्टेंबर रोजी जिल्ह्यात भेटी आणि शुक्रवारी ७ सप्टेंबरला सकाळी १0 पासून सन २0१४-१५ च्या वार्षिक प्रशासन अहवालासंदर्भात सर्वसाधारण प्रश्नावलीसंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची साक्ष होणार आहे.यासाठीच्या आवश्यक माहितीच्या पुस्तिका याआधीच संबंधित सदस्यांना पाठविण्यात आल्या आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल आणि अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रवी शिवदास हे दोघेही याच महिन्यात हजर झाल्याने त्यांनीही गेल्या पंधरवड्यात अधिकाऱ्यांच्या बैठकांचा सपाटा सुरू ठेवला आहे.

६ सप्टेंबरला जिल्हाभर दौरेगुरुवारी (दि. ६ सप्टेंबर) २८ आमदार पाचजणांच्या ग्रुपने जिल्हाभर दौरे करणार आहेत. पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक शाळा, ग्रामपंचायतींना भेटी देणार असून गटविकास अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांच्याही साक्षी घेण्यात येणार आहेत.

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदkolhapurकोल्हापूर