शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
होमस्टेमध्ये सापडलेल्या 'त्या' गोष्टीमुळे पोलिसांना सोनमवर आला संशय; पुराव्याने हत्येचे गूढ उकले
6
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
7
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
8
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
9
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
10
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
11
लोकल लेट का होते? ते शोधा, तरच अपघात कमी होतील, मुंब्रा दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर प्रवासी संघटनांचे मत
12
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
13
नव्या स्थानकांच्या उभारणीत रेल्वेचा हात आखडताच, नवे ठाणे, चिखलोली, दातीवली, मानस मंदिरसह ३२ स्थानकांचा होता प्रस्ताव
14
लेखी परीक्षा होणार कडेकोट बंदोबस्तात, गैरप्रकार टाळण्यासाठी नवी मुंबई पालिकेचे पोलिस खात्याला पत्र
15
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
16
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
17
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
18
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
19
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
20
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?

"मराठीतून मिळणार अभियांत्रिकीचे शिक्षण, नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य"

By संताजी मिठारी | Updated: August 31, 2022 11:03 IST

विद्यार्थ्यांना मराठीतून मूलभूत संकल्पना आत्मसात करता येतील

कोल्हापूर : नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषेतील शिक्षणाला प्राधान्य आहे. त्यानुसार तंत्रनिकेतन, अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम आणि पुस्तके मराठीमध्ये उपलब्ध करून दिली जातील. त्यामुळे विद्यार्थ्यांना मराठीतून मूलभूत संकल्पना आत्मसात करता येतील, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्रीचंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी येथे केले.विद्यापीठ विकास मंचतर्फे आयोजित सत्कारावेळी ते बोलत होते. शासकीय विश्रामगृहातील राजर्षी शाहू सभागृहातील या कार्यक्रमात मंचचे प्रदेशाध्यक्ष प्रा. एन. डी. पाटील यांच्या हस्ते मंत्री पाटील यांचा सत्कार करण्यात आला. पुणे पदवीधर मतदारसंघात पराभव झाल्याची खंत आहे. आपण नोंदणी केली; पण मतदारांना मतदानासाठी आणण्यात कमी पडलो. सिनेट निवडणुकीत तसे होऊ नये यासाठी मेहनत घेण्याची गरज आहे. त्यासाठी आतापासूनच तयारीला लागा, अशा सूचना मंत्री पाटील यांनी यावेळी दिल्या. भारतीय मातीचा सुगंध असलेले शैक्षणिक धोरण आले आहे. चंद्रकांत पाटील यांच्या कारकिर्दीमध्ये हे धोरण गतिमान होईल, असा विश्वास प्रा. पाटील यांनी व्यक्त केला.संजय परमणे यांच्या कार्यवृत्तांत अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, अभिजित पाटील, एन. बी. गायकवाड, पंकज मेहता, विशाल गायकवाड, केशव गोवेकर, अनिरुद्ध कोल्हापुरे, हर्षवर्धन पंडित, आदी उपस्थित होते. अमित कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. राहुल माने यांनी आभार मानले.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरEducationशिक्षणchandrakant patilचंद्रकांत पाटील