शहरं
Join us  
Trending Stories
1
ही मराठी माणसांच्या नाही तर ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई; एकनाथ शिंदेंचा घणाघात
2
"मला काहून पाडलं? मह्या तोंडाला फेस येतो... माणूस पाहायचा नाही, फक्त...!'; दानवेंचं विधान चर्चेत, नेमकं काय म्हणाले?
3
“‘टॉयलेट मॅनर्स’ आहेत, त्यांनीच स्लीपर वंदे भारत ट्रेनने प्रवास करावा”; रेल्वे अधिकाऱ्यांची पोस्ट चर्चेत
4
अपहरण झालेल्या चिमुकलीच्या सुटकेसाठी राप्ती सागर एक्स्प्रेस नॉन-स्टॉप २६० किमी धावली!
5
"मुंबईमध्ये 'पाडू' मशीन सरसकट वापरले जाणार नाही, तर..."; राज ठाकरेंच्या संतापानंतर आयुक्त गगराणींचा खुलासा
6
उणे ४०% गुण घेणाऱ्यांनाही मिळणार अ‍ॅडमिशन; NEET PG कट-ऑफ कमी करण्याच्या निर्णयाने वाद
7
बिटकॉइनचा धमाका! ९६ हजार डॉलर्सचा टप्पा ओलांडून २ महिन्यांच्या उच्चांकावर; पुढे काय होईल?
8
टॅरिफचा हत्यार म्हणून वापर करणारे ट्रम्प आपल्याच देशात अडकले, पॉवेल यांच्यावरील तपास पडला भारी
9
Instagram : रील स्टार व्हायचंय? मग चुकूनही दुर्लक्षित करू नका या ५ सेटिंग्ज; व्ह्यूजचा पडेल पाऊस!
10
ICC ODI Rankings: विराट कोहली पुन्हा बनला वनडेचा किंग! हिटमॅन रोहितला बसला फटका
11
मुंबईची निवडणूक निर्णायक ठरणार, मराठी अस्मितेसह या ५ मुद्यांचं भवितव्य निश्चित करणार
12
स्पेनला १५० वर्षांनंतर मिळणार पहिली महाराणी! कोण आहे राजकुमारी लिओनोर? जिच्यासाठी बदलला गेला देशाचा कायदा
13
WPL 2026: Mumbai Indiansच्या सामन्यात दिसली Anaya Bangarची 'ग्लॅमरस' झलक, फोटोंचीही चर्चा
14
कमाल! पहिल्या स्लीपर वंदे भारत ट्रेनचे टाइमटेबल आले; कधी सुटणार, किती थांबे असणार? पाहाच
15
ना OTP, ना PIN! फक्त फिंगरप्रिंट वापरुन बँक खातं होतंय रिकामं; 'आधार स्कॅम'पासून राहा सावध
16
संसदेसह सार्वजनिक ठिकाणांवरून सावरकरांचे फोटो हटवण्याची मागणी, सर्वोच्च न्यायालय याचिकेवर भडकलं; माजी अधिकाऱ्याला सुनावलं
17
मोठी बातमी! निवडणूक आयोग EVM मशीनला 'पाडू' नावाचे नवीन डिव्हाइस जोडणार; राज ठाकरेंच्या आरोपाने नव्या वादाला फोडणी
18
‘भाजपाने राज्यात विषवल्ली जन्माला घातली, मनपा निवडणुकीत ही विषवल्ली कापा’, काँग्रेसचं आवाहन
19
“राहुल गांधींची प्रभू श्रीरामांवर श्रद्धा, आता अयोध्येला जाणार”; काँग्रेस नेते म्हणाले…
20
IND vs NZ : 'लॉटरी' लागली तो बाकावरच! टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हमध्ये 'या' खेळाडूची एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2020 04:41 IST

खेड : कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरूकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये रेल्वे मार्गावरील नातूनगर बोगद्यानजीक सोमवारी दुपारी ...

खेड : कोकण रेल्वे मार्गावर मुंबईहून मंगळुरूकडे जाणाऱ्या नेत्रावती एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये रेल्वे मार्गावरील नातूनगर बोगद्यानजीक सोमवारी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास बिघाड झाल्याने १ तास ५० मिनिटे रेल्वेची वाहतूक ठप्प झाली होती.

कुर्ला लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटलेल्या नेत्रावती एक्स्प्रेसचे इंजिन नातूनगर बोगद्यानजीक बिघडले. त्यामुळे चालकाने गाडी थांबवली. याबाबतची माहिती रेल्वे प्रशासनाला दिल्यानंतर खेड स्थानकाकडून नवीन इंजिन नातूनगर येथे पाठवण्यात आले. नवीन इंजिन जोडल्यानंतर सायंकाळी ५.४५ वाजण्याच्या सुमारास नेत्रावती एक्स्प्रेस मंगळुरूच्या दिशेने रवाना झाली. गेल्या काही दिवसांत कोकण रेल्वेकडून नववर्ष व नाताळ सणानिमित्त विशेष गाड्या धावत असून, इंजिन बंद पडल्याने अनेक गाड्या खोळंबल्या होत्या.

नेत्रावती एक्स्प्रेसमधील प्रवाशांची आबाळ होऊ नये, याकरिता रेल्वे प्रशासनाकडून तातडीने खबरदारी घेण्यात आली. इंजिन बंद पडलेल्या ठिकाणी रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेऊन प्रवाशांना मदत केल्याची माहिती रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी दिली.