शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

पाण्यासाठीचा संघर्ष संपेना : दानोळीनंतर कोथळीकरांचाही विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2018 00:47 IST

इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची

संतोष बामणे ।उदगाव : इचलकरंजी शहरासाठी मंजूर झालेल्या अमृत योजनेचा वाद गेल्या दोन वर्षांपासून सुरू आहे. दानोळी (ता. शिरोळ) येथून पाणी देणार नाही, यासाठी वारणाकाठच्या जनतेने मोठ्या संघर्षानंतर अखेर इचलकरंजीची योजना हाणून पाडली. त्यानंतर इचलकरंजीला कोथळीतील कृष्णा-वारणा संगमावरील पर्याय समोर होता. इतक्यात कोथळी ग्रामस्थांनी याला विरोध दर्शविल्याने इचलकरंजी शहर व शिरोळ तालुका यामध्ये सुरू असलेला पाण्याचा संघर्ष मात्र वाढत चालला आहे.

इचलकरंजी शहरासाठी वारणा नदीतून अमृत योजना मंजूर झाल्यापासून इचलकरंजीकरांना शुद्ध व मुबलक पाणी मिळेल, अशी आशा होती. मात्र, वारणा नदीतील पाण्याची क्षमता कमी आहे. त्यामुळे वारणाकाठच्या शेतीला व पिण्यासाठी पाण्याची कमतरता भासतअसल्याने इचलकरंजीला वारणेचे पाणी देणार नाही, यावरून गेल्या दोन वर्षांपासून घडामोडी व संघर्ष सुरू आहे. अखेर मुंबई येथील बैठकीत दानोळी येथून अमृत योजना रद्द झाल्याचा निर्णय झाला. तसेच कोथळी-हरिपूर येथील कृष्णा- वारणा नदीच्या संगमापासून मजरेवाडीपर्यंतच्या कृष्णाकाठावर प्राधिकरण विभागाने उपसा केंद्राची जागेची पाहणी करून योजना आणावी, असे बैठकीत ठरले होते. अशातच दानोळीच्या विषयावर पडदा पडतो इतक्यातच कोथळीकरांनी संगमातून पाणी नेण्यासाठी कडकडून विरोध दर्शविला आहे.

कृष्णा-वारणा संगमावर प्राधिकरण विभागाचे अधिकारी अचानक पाहणी करायला आले होते. त्यांना गावकऱ्यांनी पिटाळून लावले. दुसºया दिवशी इचलकरंजी शहराला पाणी द्यायचे नाही, या विरोधात सर्वपक्षीय बैठक घेऊन गावबंद ठेवले. तसेच शेतकरी नेते प्रा. एन. डी. पाटील यांच्याशी चर्चाही झाली. तसेच कृष्णाकाठावरील असलेल्यासर्वच गावांना एकत्रित करण्याचे काम कोथळी गावाने सुरू केले आहे. त्यामुळे इचलकरंजी शहराला कृष्णा-वारणा नदीचा संगम ते मजरेवाडीपर्यंत पाणी द्यायचे नाही, यावर निर्णयावर ठाम आहेत. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील जनतेचा व इचलकरंजी शहराचा संघर्ष वाढत चाललेला दिसत आहे. त्यामुळे वारणाकाठच्या व कृष्णा नदीकाठच्या जनतेचा विचार करून लोकप्रतिनिधींनी निर्णय घ्यावा,अशीे मागणी शिरोळ तालुक्यातून होत आहे.जनतेचा विचार महत्त्वाचाइचलकरंजी शहरालगत पंचगंगा नदी आहे. ही नदी इचलकरंजी शहरामुळेच प्रदूषित झाली आहे. त्यामुळे शिरोळ तालुक्यातील पंचगंगा काठावरील गावांमध्ये दूषित पाणीपुरवठा होऊन आजारांना सामोरे जावे लागत आहे. अशातच इचलकरंजी शहराला वारणेतून पाणी देण्याचा हट्ट इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींचा आहे. मात्र, हा हट्ट करण्याऐवजी कृष्णा व वारणाकाठच्या जनतेच्या लोकप्रतिनिधींनी विचार करून निर्णय घ्यावा, अन्यथा कोणतेही संकट आल्यास त्यासाठी आम्ही तयार असल्याचे कोथळी सरपंच अमृत पाटील-धडेल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. 

मुंबई येथे झालेल्या बैठकीत कोथळी-हरिपूर संगम ते मजरेवाडीपर्यंत देण्याचा निर्णय झाला आहे. इचलकरंजीसाठी सध्या पंचगंगा व कृष्णा येथून पाणीपुरवठा होतो. अशातच शेतकºयांच्या तोंडचे पाणी पळवून नेण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे मतासाठी पाण्याचे राजकारण इचलकरंजीच्या लोकप्रतिनिधींनी करू नये, अन्यथा कोथळीकर एकीचे बळ दाखवतील.- राजगोंडा पाटील,पं. स. सदस्य, कोथळी.

टॅग्स :water shortageपाणीटंचाईkolhapurकोल्हापूर