शहरातील आठ खुल्या जागांवरील अतिक्रमणे हटविली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 04:19 IST2021-01-14T04:19:50+5:302021-01-14T04:19:50+5:30
कोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या मालकीच्या आठ खुल्या जागांवरील अतिक्रमणे बुधवारी महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयातर्फे हटविण्यात आली. प्रशासक डॉ. ...

शहरातील आठ खुल्या जागांवरील अतिक्रमणे हटविली
कोल्हापूर : शहरातील महापालिकेच्या मालकीच्या आठ खुल्या जागांवरील अतिक्रमणे बुधवारी महापालिकेच्या गांधी मैदान विभागीय कार्यालयातर्फे हटविण्यात आली. प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या सूचनेनुसार ही कारवाई सुरु करण्यात आली आहे.
बुधवारच्या कारवाईत गंधर्व नगरी येथील एक अनधिकृत शेड, हिंदू कॉलनी येथील एक शेड, सुलोचना पार्क येथील तीन शेड, १०४२ / एफ / ९ येथील दोन शेड व फुलेवाडी रिंगरोड येथील एक पत्र्याची शेड काढण्यात आली. ही कारवाई शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांच्या मार्गदर्शनाखाली उपशहर अभियंता एन. एस. पाटील, कनिष्ठ अभियंता अनिरुध्द कोरडे व मुकादम यांनी केली. खुल्या जागेवरील अतिक्रमणांविराेधातील कारवाई अशीच सुरु राहणार असून, संबधितांनी अतिक्रमणे काढून टाकावीत, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.
- राजारामपुरीत ४६ बोर्डवर कारवाई
राजारामपुरी विभागीय कार्यालयाने विविध ठिकाणचे अवैध व अनधिकृत ४६ जाहिरात फलक, होर्डिंग काढून जप्त केली. या कारवाईत अतिक्रमण विभागानेही भाग घेतला. यामध्ये बागल चौक, पार्वती टॉकीज, सावित्रीबाई फुले दवाखाना, गोखले कॉलेज, हुतात्मा पार्क, यादवनगर, माऊली चौक, राजारामपुरी आमदार पी. एन. पाटील बंगला परिसर, टाकाळा, टेंबाईवाडी, विक्रमनगर, कमला कॉलेज, राजारामपुरी बस रुट, पांजरपोळ या ठिकाणांवरील २८ डिजिटल बोर्ड व १८ स्टॅन्ड बोर्ड हटवून ते जप्त करण्यात आले. ही कारवाई उपशहर अभियंता बाबूराव दबडे, पंडित पोवार, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील व कर्मचाऱ्यांनी केली.