शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

हुपरीतील गायरानात धनदांडग्यांचे अतिक्रमण : राजकीय नेत्यांचा वरदहस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2019 00:04 IST

तानाजी घोरपडे । हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील गट नंबर ९२५/६ या सरकारी गायरानावर धनदांडग्या व राजकीय नेत्यांच्या ...

ठळक मुद्देनगरसेवकांनी तक्रार करूनही पालिकेने फलक लावण्यापलीकडे काही केले नाही

तानाजी घोरपडे ।हुपरी : हुपरी (ता. हातकणंगले) येथील गट नंबर ९२५/६ या सरकारी गायरानावर धनदांडग्या व राजकीय नेत्यांच्या शंभरहून अधिक हितसंबंधितांनी व बगलबच्च्यांनी अतिक्रमण केले आहे. याबाबत स्थानिक नगरसेवक संदीप वार्इंगडे व सपना नलवडे यांच्यासह अनेक जणांनी नगरपरिषदेकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. मात्र, यामध्ये नगरपरिषदेतील कारभाऱ्यांचेच हात गुंतल्यामुळे नगरपरिषदेने या गंभीर प्रकरणाची साधी दखलही घेतली नाही. त्यामुळे शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे.

शहरात नगरपरिषद होऊन एक वर्षे पूर्ण झाले आहे. स्वतंत्र इमारत व जागा नसल्याने नगरपरिषदेचे कामकाज सध्या भाड्याने घेतलेल्या केंद्रीय प्राथमिक शाळेच्या काही खोल्यांतून चालते. शहरात अनेक मोक्याच्या जागा आहेत. तेथे ग्रामपंचायतीच्या काळात बड्या राजकीय नेत्यांनी व त्यांच्या बगलबच्च्यांनी अतिक्रमणे केली आहेत. हुपरी-यळगूड मार्गालगत कोट्यवधी रुपये किमतीचे सरकारी गायरान आहे. या ठिकाणी गेल्या काही वर्षांपासून अनेक धनदांडग्यांनी व राजकारण्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करून आपल्या बगलबच्च्यांना आसरा करून दिला आहे.

हे प्रकरण गेल्या चाळीस वर्षांपासून न्यायालयीन प्रक्रियेत अडकले आहे. अशी वस्तुस्थिती असतानाही नगरपरिषदेतील काही कारभाºयांनी शहरातील काही धनदांडग्यांना हाताशी धरून उर्वरित गायरानात पुन्हा मोठ्या प्रमाणात अतिक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. याबाबत नगरसेवक संदीप वार्इंगडे व सपना नलवडे यांनी नगरपरिषदेकडे यासंबंधी तक्रारी करून येथील अतिक्रमणे ताबडतोब काढण्यासाठी निवेदन दिले आहे. या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशाराही दिला आहे. तरीही नगरपरिषद प्रशासनाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्यामुळे आतापर्यंत या ठिकाणी शंभरहूूून अधिक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणधारकांमध्ये शहरांतील धनदांडगे व राजकारण्याचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या गायरानावरील अतिक्रमणामुळे शहरात राजकीय संघर्ष अनेकवेळा घडल्यामुळे परत पुन्हा राजकीय रणकंदन पहायला मिळण्याची चिन्हे दिसत आहेत.नगरपरिषदेचा फलक लावल्यावरही पन्नासभर अतिक्रमणे वाढलीहुपरी शहरातील गट नंबर ९२५/६ हे सरकारी गायरान अनेक वर्षांपासून असंवेदनशील विषय आहे. येथे अतिक्रमणे करू नये म्हणून मागील महिन्यात नगरपरिषदेने सूचना देणारा फलक लावला; परंतु यानंतरही अतिक्रमणांची संख्या कमी न होता उलट सुमारे पन्नासहून अधिक संख्या वाढल्याने शहरात आश्चर्य व्यक्त होत आहे. 

गट नंबर ९२५/६ या सरकारी गायरानावर गेल्या आठवडयात पन्नासहून अधिक अतिक्रमणे करण्यात आली आहेत. ती तत्काळ काढण्यासाठी प्रांताधिकारी, तहसीलदार, मुख्याधिकारी यांना निवेदने देऊन आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जुन्या साठ ते सत्तर अतिक्रमणधारकांसाठी अतिक्रमणे नियमित करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.- संदीप वार्इंगडे, सपना नलवडे,नगरसेवक, हुपरीहुपरी शहरातील गट नंबर ९२५/६ हे सरकारी गायरान अनेक वर्षांपासून वादग्रस्त आहे. सध्या या ठिकाणी पन्नासभर अतिक्रमणे करण्यात आल्याचे समजले आहे. याबाबत नगरपरिषदेचे अधिकारी माहिती घेत असून सर्वांना नोटिसा पाठवून पुढील कारवाई लवकरच करण्यात येईल.- जयश्री गाट, नगराध्यक्षा 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरfraudधोकेबाजी