शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या सकारात्मक भूमिकेचे मोदींकडून स्वागत; म्हणाले, "भारत आणि अमेरिकेमध्ये..."
2
Ganpati Visarjan: भर पावसात, जल्लोषात गणरायाला निरोप; मुंबईत ढोल-ताशांसह गुलालाची उधळण
3
आजचे राशीभविष्य - ७ सप्टेंबर २०२५, नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल दिवस
4
ट्रम्प यांची मोठी घोषणा...! 'या' देशांना दिली जाणार टॅरिफ सूट, नवा कार्यकारी आदेश जारी
5
Aryna Sabalenka : बेलारूसच्या सुंदरीनं घरात घुसून घेतला बदला! सलग दुसऱ्यांदा जिंकली US ओपन स्पर्धा
6
पाकिस्तानात क्रिकेट सामन्यादरम्यानच मैदानात बॉम्बस्फोट; एकाचा मृत्यू, अनेक जखमी
7
भारत-रशिया-चीन एकत्र बघून NATOचं टेन्शन वाढलं? युक्रेन युद्धासंदर्भात 'या' नेत्याचं मोठं विधान!
8
आता रशिया-युक्रेन युद्ध थांबणार? पंतप्रधान मोदींची फ्रान्सच्या अध्यक्षांसोबत चर्चा; मॅक्रॉन म्हणाले...!
9
ओबीसींचा महामोर्चा काढणार, दोन पातळ्यांवर लढणार; काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा निर्धार
10
...अन् हिटमॅन रोहित शर्मानं चाहत्यांना हात जोडून केली विनंती; नेमकं काय घडलं? व्हिडिओ व्हायरल
11
विसर्जनासाठी गेलेला 'गणेश' गिरणा पात्रात वाहून गेला, आई-वडिलांच्या डोळ्यासमोरच तरुण मुलगा बुडाला... 
12
गुजरातमधील पंचमहल यथे मोठा अपघात; पावागडमध्ये रोपवे कोसळला, 6 जणांचा मृत्यू
13
भाईंदरमध्ये गणेश मंडळाच्या कार्यकर्त्याचा शॉक लागून मृत्यू 
14
“PM मोदींच्या नेतृत्वाखालील सक्षम, नवीन भारत आपले परराष्ट्र धोरण स्वतः ठरवतो”: CM फडणवीस
15
एकनाथ शिंदे यांनी घेतली शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांची भेट; म्हणाले, “अभिमानास्पद...”
16
गोपाळ शेट्टींसह मेहता, गुप्ता, मिश्रा अन् शर्मा यांच्यावर मुंबई भाजपानं दिली मोठी जबाबदारी
17
फक्त ३ वर्षांत दिला ५३२% परतावा, आता कंपनीला मिळाली ₹३,००,००,००० ची ऑरडर; ₹१०० पेक्षाही स्वस्त आहे शेअर!
18
Asia Cup Record : सचिन तेंडुलकर भारताचा 'नंबर वन ऑलराउंडर'; जयसूर्याची तर गोष्टच न्यारी
19
अमेरिका निघाली होती रशियाला पंगू बनवायला, आता स्वतःवरच आली अंडी खरेदीची वेळ! ३२ वर्षांत पहिल्यांदाच...
20
CM फडणवीसांकडून ग्रीन सिग्नल मिळताच अजित पवार गटाला बसणार झटका?; भाजपा आमदार लागले कामाला

Kolhapur: पश्चिम महाराष्ट्र देवस्थानच्या जमिनीतील ६७१ गटांवर अतिक्रमण

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: May 28, 2025 17:56 IST

१९० मंदिरे , ४८१ लागणदार जमिनी : घरे, दुकाने, हॉल, हॉटेलचा समावेश

अंबाबाई, जोतिबासहकोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग या चार जिल्ह्यातील ३ हजार ६४ मंदिराचे व्यवस्थापन बघणाऱ्या पश्चिम महाराष्ट्र दैवस्थान समितीकडे देवाच्या मालकीची २८ हजार एकर जमीन आहे. या जमिनींचे सर्वेक्षण सारआयटी कंपनीकडून सुरू आहे. यात अनेक मंदिरांमध्ये, जमिनींमध्ये भोठ्या प्रमाणात अतिक्रमण, परस्पर खरेदी-विक्री, देवाचे नाव काढून स्वतःची नावे सातबारावर लावण्याचे प्रकार आढळले आहेत. काही ठिकाणी भुसंपादन होऊन दमडीही देवस्थानला मिळालेली नाही. या सर्वांवर आधारीत मालिका आजपासून..

इंदुमती गणेशकोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारितील १९० मंदिरांमध्ये तसेच लागणदार जमिनीतील ४८१ अशा एकूण ६७१ गटांवर शेतकऱ्यांची टोलेजंग घरे, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, पोस्ट, खासगी दुकाने, सोसायट्या, मंडळे, शाळा, सहकारी संस्था, पतसंस्था, गोडावून, सांस्कृतिक हॉल, हॉटेल, तालीम असे अतिक्रमण झाले आहे. समितीकडील जमिनीवर वारेमाप अतिक्रमण झाले आहे.

समितीच्या अखत्यारितील देवस्थानांच्या नेमक्या किती जमिनी आहेत याचे सर्वेक्षण करण्याचा ठेका २०१७ मध्ये तत्कालीन समिती पदाधिकाऱ्यांनी मुंबईच्या सार आयटी कंपनीला दिला. हे सर्वेक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये देवस्थानच्या जवळपास सर्वच जमिनींवर अतिक्रमण झाल्याचे आढळले आहे. सध्या ४८१ गटांची माहिती आहे, सिंधुदुर्गमधील मोजणी बाकी असल्याने अंतिम सर्वेक्षणानंतरची अतिक्रमणांची संख्या मोठी असणार आहे.

मोजणीला विरोध.. क्षेत्र कळेनासार आयटीचे कर्मचारी गेल्यानंतर ते देवस्थानकडूनच आलेत का, जमीन दुसऱ्याला कसायला देतील, काढून घेतील, अतिक्रमण, शर्तभंगाची कारवाई करतील या गैरसमजातून मोजणीला विरोध केल्याने जमिनी व त्यावरील अतिक्रमित क्षेत्राची मोजणी झालेली नाही. गटात काेणते अतिक्रमण आहे एवढीच माहिती आहे.

तालुका : अतिक्रमित लागणदार जमिनीआजरा : धामणे, हतिवडे, होण्याळी, खेडे, कानोली, कोळिंद्रे, महागांव, मलिग्रे, साळगाव, येमेकोंड महाल.भुदरगड : आदमापूर, बामणे, आकुर्डे, मुरुक्टे, वासनोळी, भाटिवडे, बेगवडे,, देवर्डे, गंगापूर, हेदवडे, गिरगाव, खानापूर, मिणचे खुर्द, मोरेवाडी, पाचवडे, पाल, टिक्केवाडी, सोनारवाडी, निळपण, बेडीव.गडहिंग्लज : बटकणंगले, भडगाव, चिंचेवाडी, हलकर्णी, हसुरगिरी, नेसरी, सांबरे, सरोळी, येणेचवंडी, मुंगुरवाडी, मेजेवाडी, मांगूरतर्फ सावंतवाडी.गगनबावडा : असंडोली, बामवेळी, किरवे, म्हाळुंगे, मुटकेश्वर, साखरीहातकणंगले : हालोंडी, कुंभाज, हेर्ले, नरंदे, पारगाव, वडगाव,.कागल : बाचणी, एकोंडी, हळदवणे, करंजवणे, करड्याळ, केनवडे, कुमी, माळंगे, सावर्डे, सिद्धनेर्ली.करवीर : आमशी, आरे, बाचणी, बीड, बेले, भामटे, भाटणवाडी, चाफाेडी, चुये, देवळे, दिंडनेर्ली, दोनवडे, घुंगुरवाडी, गिरगाव, हळदी, हसूर दुमाला, हिरवडे दुमाला-खालसा, कळंबे तर्फ कळे, कांडगाव, करवीर, केर्ली, खेबवडे, खुपीरे, कोगील, कोपार्डे, कुडीत्रे, महे, कुरुकली, मांडरे, मांजरेवाडी, म्हालसवडे, म्हाळुंगे, म्हारुळ, नेर्ली, निगवे खालसा, शिंगणापूर, सडोली दुमाला, शिंगणापूर, शिरोली दुमाला, परिते, सांगरुळ, सोनाळी, पाटेकरवाडी, उपवडे, वाशी.पन्हाळा : वाडी-रत्नागिरी, वाघुर्डे, आकुर्डे, आळवे, आंबर्डे, आसगांव, बाजारभोगाव, बोरपाडळे, देवाळे, घरपण, घोटवडे, इंजोळे, जाखले, मांजर, मरळी, सातार्डे, सुळे, तांदुळवाडी, काटेभोगाव, कणेरी,राधानगरी : चांदे, ऐनी, आपटळ, अर्जुनवाडा, आवळी, धामणवाडी, धामोड, कासारवाडा, कोदे, मोहाडे, पंडेवाडी. पिरळ, फेजीवडे, सावर्डे, शेळेवाडी, सिरसे, सोळांकूर, तळाशी, तरसंबळे, ठिकपूर्ली, राशिवडे, रामणवाडी, राधानगरी, तिटवे, सोन्याची शिरोली.शाहूवाडी : आकुर्ले, आंबर्डे, गोगवे, करंजोशी, गोगवे, माळापुडे, म्हालसवडे, नांदरी, नंदगाव, पिशवी, पेंडाखळे, सैदापूर, साळशी, सांबू, सरुड, ससेगाव, सावे, शिंपे, शितूर तर्फ मलकापूर, सोनवडे, सोनुर्ले, टेकोली, थेरगाव, विरळे, मान, मार्ले, नेर्ले, पाल, परखंदळे, पेरीड, सावे.शिरोळ : अर्जुनवाड, शिरोळ, निमशिरगाव, दानवाड.

सांगलीतील जत मिरज येथील अंगी,बेगेवाडी, प्रतापपूर. सोनलगी, उमडी, मिरज.गावांची नावे ही प्रातिनिधीक असून प्रत्यक्षात आणखी गावांचा समावेश आहे. तसेच मंदिरांमधील अतिक्रमणांची यादी लोकमतकडे उपलब्ध आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरTempleमंदिरMahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरJyotiba Templeजोतिबा