शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मणिकर्णिकावरील अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2021 20:30 IST

Mahalaxmi Temple Kolhapur-करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमण विनाअट व विनामोबदला पुढील दोन दिवसांत काढून घेण्याचे माऊली लॉजचे मालक अनिकेत आगळगावकर यांनी सोमवारी मान्य केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सामोपचाराने हा निर्णय घेण्यात आला.

ठळक मुद्देमणिकर्णिकावरील अतिक्रमण दोन दिवसांत हटवणार माऊली लॉजचा निर्णय : बैठकीत सामोपचाराने निर्णय

कोल्हापूर : करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसरातील मणिकर्णिका कुंडावरील अतिक्रमण विनाअट व विनामोबदला पुढील दोन दिवसांत काढून घेण्याचे माऊली लॉजचे मालक अनिकेत आगळगावकर यांनी सोमवारी मान्य केले. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती, शिवसेनेचे पदाधिकारी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सामोपचाराने हा निर्णय घेण्यात आला.मणिकर्णिका कुंडाच्या पश्चिमेकडील बाजूचे उत्खनन माऊली लॉजच्या अतिक्रमणामुळे थांबले होते. चार दिवसांपूर्वी देवस्थान समितीने आयुक्तांची भेट घेऊन अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. तत्पूर्वी शिवसेनेने लॉजसमोर आंदोलन केले होते. त्यानंतरही तोडगा न निघाल्याने सोमवारी देवस्थान समितीच्या शिवाजी पेठेतील कार्यालयात संयुक्त बैठक झाली.

समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांनी जागा समितीची असल्याने ती आमच्या ताब्यात द्यावी, असे सांगितले. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी लॉजचे मालक अनिकेत आगळगावकर यांना मंदिराच्या कामात अडथळा आणू नये, असे सांगून अतिक्रमण हटवण्याची मागणी केली. यानंतर आगळगावकर यांनी विनाअट, विनाशर्त व विनामोबदला पुढील दोन तीन दिवसांत कुंडावरील कार्यालय व पाण्याची टाकी हे अतिक्रमण हटवण्याचे व लॉजच्या मालकीच्या जागेत स्थलांतर करण्याचे मान्य केले.यावेळी समितीच्या कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजेंद्र जाधव, सचिव विजय पोवार, शिवसेनेचे विजय देवणे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, रमेश मस्कर, आरती नांद्रेकर, आर. डी. पाटील उपस्थित होते.

 

टॅग्स :Mahalaxmi Temple Kolhapurमहालक्ष्मी मंदिर कोल्हापूरkolhapurकोल्हापूरMahesh Jadhavमहेश जाधवReligious Placesधार्मिक स्थळे