शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
2
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
3
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
4
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
5
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
6
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
7
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
8
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
9
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
10
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
11
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
12
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
13
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
14
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
15
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
16
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
17
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
18
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
19
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा
20
सुनील नरीनची आतषबाजी, एकाना स्टेडियमवर KKR चा विक्रम; LSGच्या घरी जाऊन धुलाई

विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 4:17 PM

Fort Kolhapur- गेल्या २० वर्षात किल्ले विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. मात्र याकडे राजकारण्यांपासून पुरातत्व खाते, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याला वाचा फोडण्यासाठी १९ मार्च रोजी शिवाजी चौकासह राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केला आहे.

ठळक मुद्देविशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे राजकारण्यांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष-सुनील घनवट

कोल्हापूर -गेल्या २० वर्षात किल्ले विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. मात्र याकडे राजकारण्यांपासून पुरातत्व खाते, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याला वाचा फोडण्यासाठी १९ मार्च रोजी शिवाजी चौकासह राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केला आहे.विशाळगडावरील अतिक्रमणे, पुरातत्व खात्याची बेजबाबदाल लेखी उत्तरे, बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यासह शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांच्या समाध्यांकडे झालेले दुर्लक्ष याबाबत सोदाहरण माहिती त्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.घनवट म्हणाले, आमच्यासाठी वंदनीय असणाऱ्या व्यक्तिंच्या समाध्यांकडे दुर्लक्ष आणि दर्ग्यांच्या विकासासाठी मात्र लाखो रूपये खर्च केले जात आहेत. १९९७ ते २०१८ या कालावधीचा अभ्यास करता किल्ल्यावरील मंदिरांचे आणि जागेचे क्षेत्रफळ कमी झाले आहे तर मशिदी आणि दर्ग्यांच्या जागा वाढली आहे.

त्यामुळे १९९८ च्या नंतरची सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत, पुरातत्वच्या अधिकाऱ्यांना आठवड्याला भेटी द्याव्यात आणि सध्याच्या स्थितीचा अहवाल तयार करावा, गडावरील सर्व मंदिरांच्या माहितीचे फलक लावावेत, मद्यमान आणि मांसविक्रीला बंदी करावी, पर्यटकांची निवासव्यवस्था गडाखाली करावी, गडाची ग्रामदेवता असणाऱ्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरूस्ती व जीर्णोध्दार करावा अशा मागण्या यावेळी करण्यात घनवट यांनी केल्या.मलकापूर येथील बाबासाहेब भोपळे म्हणाले, शासनाच्याच पत्रानुसार अतिक्रमणे झाल्याचे मान्य केल्यानंतर कारवाई का होत नाही. यावेळी चारूदत्त पोतदार, रमेश पडवळ, किशोर घाटगे, प्रमोद सावंत, सुरेश यादव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, किरण दुसे,  समीर पटवर्धन यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणारया संबंधामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची बुधवारी भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

टॅग्स :FortगडHindu Janajagruti Samitiहिंदू जनजागृती समितीkolhapurकोल्हापूर