विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:17 PM2021-03-16T16:17:10+5:302021-03-16T16:23:56+5:30

Fort Kolhapur- गेल्या २० वर्षात किल्ले विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. मात्र याकडे राजकारण्यांपासून पुरातत्व खाते, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याला वाचा फोडण्यासाठी १९ मार्च रोजी शिवाजी चौकासह राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केला आहे.

Encroachment on 64 places at Vishalgad | विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे

विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे

googlenewsNext
ठळक मुद्देविशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे राजकारण्यांपासून प्रशासनाचे दुर्लक्ष-सुनील घनवट

कोल्हापूर -गेल्या २० वर्षात किल्ले विशाळगडावर ६४ ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत. मात्र याकडे राजकारण्यांपासून पुरातत्व खाते, महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेपासून ग्रामपंचायतीचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे. याला वाचा फोडण्यासाठी १९ मार्च रोजी शिवाजी चौकासह राज्यभर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा विशाळगड रक्षण आणि अतिक्रमणविरोधी कृती समितीचे प्रवक्ते सुनील घनवट यांनी केला आहे.

विशाळगडावरील अतिक्रमणे, पुरातत्व खात्याची बेजबाबदाल लेखी उत्तरे, बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्यासह शिवरायांच्या सुनबाई अहिल्याबाई भोसले यांच्या समाध्यांकडे झालेले दुर्लक्ष याबाबत सोदाहरण माहिती त्यांनी मंगळवारी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

घनवट म्हणाले, आमच्यासाठी वंदनीय असणाऱ्या व्यक्तिंच्या समाध्यांकडे दुर्लक्ष आणि दर्ग्यांच्या विकासासाठी मात्र लाखो रूपये खर्च केले जात आहेत. १९९७ ते २०१८ या कालावधीचा अभ्यास करता किल्ल्यावरील मंदिरांचे आणि जागेचे क्षेत्रफळ कमी झाले आहे तर मशिदी आणि दर्ग्यांच्या जागा वाढली आहे.

त्यामुळे १९९८ च्या नंतरची सर्व अतिक्रमणे काढून टाकावीत, पुरातत्वच्या अधिकाऱ्यांना आठवड्याला भेटी द्याव्यात आणि सध्याच्या स्थितीचा अहवाल तयार करावा, गडावरील सर्व मंदिरांच्या माहितीचे फलक लावावेत, मद्यमान आणि मांसविक्रीला बंदी करावी, पर्यटकांची निवासव्यवस्था गडाखाली करावी, गडाची ग्रामदेवता असणाऱ्या श्री वाघजाईदेवीच्या मंदिरासह सर्व मंदिरांची दुरूस्ती व जीर्णोध्दार करावा अशा मागण्या यावेळी करण्यात घनवट यांनी केल्या.

मलकापूर येथील बाबासाहेब भोपळे म्हणाले, शासनाच्याच पत्रानुसार अतिक्रमणे झाल्याचे मान्य केल्यानंतर कारवाई का होत नाही. यावेळी चारूदत्त पोतदार, रमेश पडवळ, किशोर घाटगे, प्रमोद सावंत, सुरेश यादव, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, किरण दुसे,  समीर पटवर्धन यांच्यासह कृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.

जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना भेटणार

या संबंधामध्ये जिल्हाधिकारी दौलत देसाई आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची बुधवारी भेट घेणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Web Title: Encroachment on 64 places at Vishalgad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.