पुरात अडकलेल्या टेम्पो चालकाची सुटका
By Admin | Updated: July 14, 2016 01:08 IST2016-07-14T01:08:39+5:302016-07-14T01:08:39+5:30
रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुटका

पुरात अडकलेल्या टेम्पो चालकाची सुटका
कसबा बावडा : बावडा-शिये रोडवर आलेल्या पुराच्या पाण्यात आयशर टेम्पो (एमएच १० क्यू २२२३) चालकास ‘एनडीआरएफ’च्या पथकाने वाचविले.
हा टेम्पो इस्लामपूरहून केळी घेऊन शिये मार्गे कोल्हापूरकडे चालला होता. टेम्पो काही अंतर पाण्यातून आल्यानंतर पाणी वाढू लागल्याने टेम्पो चालक राजू राधव हा घाबरला. त्याने आपल्या मोबाईलवरून नियंत्रण कक्षास कळविल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी यांत्रिक बोटीच्या सहायाने
त्याची रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सुटका केली.
दरम्यान, पुराचे पाणी टोल नाक्याच्याही पुढे २०० मीटर अंतर असल्याने हा रस्ता वाहतुकीस धोक्याचा ठरला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूस बॅरेकेटस् लावण्याची गरज वाहनधारकांकडून बोलली जात आहे. (प्रतिनिधी)