शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

यमगेच्या युवकाच्या पंखांना हवे मदतीचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2017 00:39 IST

अनिल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुरगूड : दुसºयाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाºया एका तरुणाने अफलातून चारचाकी गाडी तयार केली असताना त्याला पुढील दिशा मिळण्यासाठी आणि सहकार्यासाठी मोठमोठ्या राजकीय नेत्यांनीच आणि काही उद्योजकांनी अनास्था दाखवल्यामुळे त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.गेल्या अनेक महिन्यापासून कोणीतरी आपल्या तंत्रज्ञानाकडे पाहतील आणि आपल्या कल्पनेतून तयार झालेली ...

अनिल पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्कमुरगूड : दुसºयाच्या ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करणाºया एका तरुणाने अफलातून चारचाकी गाडी तयार केली असताना त्याला पुढील दिशा मिळण्यासाठी आणि सहकार्यासाठी मोठमोठ्या राजकीय नेत्यांनीच आणि काही उद्योजकांनी अनास्था दाखवल्यामुळे त्याच्या पदरी निराशाच पडली आहे.गेल्या अनेक महिन्यापासून कोणीतरी आपल्या तंत्रज्ञानाकडे पाहतील आणि आपल्या कल्पनेतून तयार झालेली गाडी रस्त्यावर धावेल हे स्वप्न पहाणाºया यमगे, ता. कागल येथील अवलियाचे नाव आहे संजय शंकर हुल्ले.यमगे येथील संजय हुल्ले हा तसा गरीब कुटुंबामध्ये जन्माला आला. शिकण्याची इच्छा प्रबळ असतानाही घरच्या गरिबीमुळे शिक्षणाचा गाडा निम्म्यावरच थांबवावा लागला. संजयला लहानपणापासून गाड्याबाबत कमालीची उत्सुकता. तो गावातील एका ट्रॅक्टरवर माती भरण्याचे काम करत होता. काही दिवसानंतर तो त्याच ट्रॅक्टरवर ड्रायव्हर म्हणून रुजू झाला व आजपर्यंत कार्यरत आहे.काहीतरी वेगळं करायचं या इराद्याने कार्यरत असणाºया संजयला वाचनाची आवड जास्तच. त्यातूनचपंतप्रधान मो दींच्या ‘मेक इन इंडिया’बाबत वाचलं आणि त्याची अनेक वर्षांपासून मनात घर करून बसलेली गाडी निर्मितीचं स्वप्न सत्यात आणण्याचा संकल्प बळावला. त्या दृष्टीने त्याने सुरुवात केली. दुसºयाच्या ट्रॅक्टरवर मोलमजुरी करून गोळा केलेली पै आणि पै त्याने खर्च केली. गावातील काहीनी त्याला मदत केली. त्यातून दिवसभर मोलमजुरी व रात्री घरात, दारातच या गाडीचे काम त्याने सुरु केले.सुरुवातीला गावकºयांनीही हा निव्वळ वेडेपणा आहे म्हणून त्याला हिणवलेही, पण आज संजयने तयार केलेली रस्त्यावर धावणारी चारचाकी गाडी दारात उभा असल्याचे पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली आहेत.आगळ्यावेगळ्या पद्धतीने बनवलेल्या या गाडीमुळे इंधनाची मोठी बचत होणार असून, पूर्णपणे निसर्गाशी निगडीत या गाडीचे धावण्याचे तंत्र आहे. अर्थात यामुळे गाड्यांमुळे वाढणाºया प्रदूषणाला आळा बसणार आहे. ही गाडी तिचे तंत्र, ड्रॉइंग घेऊन संजय अनेक उद्योजकांना भेटला, पण ते तंत्र आणि डिझाइन आपल्याला द्या, त्या बदल्यात आपण काही रक्कम आपल्याला देण्याचे आमिषही दाखवल्याचे या युवकाने सांगितले. आपण तयार केलेली गाडी सर्वसामान्यांसाठी असल्याचे त्याने सांगितले. त्यामुळे सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी आणि याचे पेटंट घेण्यासाठी या तरुणाला आर्थिक आणि सल्ला मार्गदर्शनाची गरज आहे.कागल तालुक्याला राजकीय विद्यापीठ समजले जाते. कोणत्याही विकासकामाला चालना या ठिकाणी सर्वप्रथम मिळते, पण या उमद्या तरुणाने तालुक्यातील अनेक राजकीय नेत्यांच्या भेटी घेतल्या. पण अपेक्षित यश आले नाही, पण या सगळ्याबाबत या तरुणाने नाराजी व्यक्त करत आपल्या या लाखो रुपये खर्च करून तयार केलेल्या गाडीला पेटंट मिळून रीतसर मान्यता मिळवण्याचा मानस व्यक्त केला आहे.संजयकडून लेखनहीसमाजापासून थोडेसे अलिप्त असणाºया संजयला लेखनाचाही छंद आहे. त्याने आतापर्यंत तीन चित्रपट कथा लिहिल्या आहेत. याबाबत तो नाना पाटेकर यांच्यापर्यंत पोहोचला होता. या क्षेत्रातही त्याला संधी मिळाली नसल्याचे त्याने सांगितले.