शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
3
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
4
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
5
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
6
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
7
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
8
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
9
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
10
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
11
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
12
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
13
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
14
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
15
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
16
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
17
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
18
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
19
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
20
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द

खासगी एजन्सीकडून कर्मचारी घेणार : आठ दिवसांत कार्यवाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 20:31 IST

शहरातील प्रमुख मार्गांवरील फूटपाथवर उगवलेली झाडेझुडपे काढावीत, त्यांची स्वच्छता करण्यात यावी, शहरातील रस्त्यांची पॅचवर्कची कामे गतीने करण्यात यावीत; शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे; नवीन रस्ता करण्यापूर्वी पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग, वॉर्ड आॅफिस व विद्युत कंपनी यांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना

ठळक मुद्देकोल्हापूर महापालिका बैठकीत निर्णय

कोल्हापूर : शहर स्वच्छतेच्या कामाकरिता आरोग्य विभागाकडे कर्मचारी अपुरे पडत असल्याने कर्मचारी पुरवठा करणाऱ्या खासगी ठेकेदाराकडून तातडीने मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याचा निर्णय गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी महापौर अ‍ॅड. सूरमंजिरी लाटकर होत्या.

महापालिकेच्या आरोग्य, नगररचना, पाणीपुरवठा, वाहतूक व विभागीय कार्यालय यांच्याकडील प्रकल्पांचा आढावा महापौर लाटकर यांनी गुरुवारी घेतला. यावेळी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

शहरातील प्रमुख मार्गांवरील फूटपाथवर उगवलेली झाडेझुडपे काढावीत, त्यांची स्वच्छता करण्यात यावी, शहरातील रस्त्यांची पॅचवर्कची कामे गतीने करण्यात यावीत; शिवाजी चौक, पापाची तिकटी, गंगावेश, पंचगंगा नदी या रस्त्यांचे काम तत्काळ सुरू करावे; नवीन रस्ता करण्यापूर्वी पाणीपुरवठा, ड्रेनेज विभाग, वॉर्ड आॅफिस व विद्युत कंपनी यांनी समन्वय ठेवून काम करावे, अशा सूचना महापौर लाटकर यांनी यावेळी दिल्या. अमृत योजनेअंतर्गत ड्रेनेज लाईनचे काम व रिस्टोलेशनचे काम प्रगतिपथावर नाही. त्यांच्या कामाचे अद्याप नियोजन झालेले नाही याबद्दल महापौरांनी नाराजी व्यक्त केली.

शहरातील बंदिस्त झालेल्या २१ ठिकाणांचे पार्किंग खुले करण्यात आले असून ही कारवाई अधिक तीव्र करून सदरचे पार्किंग नागरिकांना खुले करून द्यावे, असे महापौरांनी सांगितले. वाहतूक विभागाशी चर्चा करून शहरातील पार्किंग, नो पार्किंग, सम व विषम पार्किंग झोन निश्चित करण्याचे बैठकीत ठरले. व्हीनस कॉर्नर येथील वाहनतळावर अंबाबाई मंदिराकडे येणारी वाहने लावण्यास तत्काळ सुरू करण्याचेही यावेळी ठरले.

याप्रसंगी आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपमहापौर संजय मोहिते, स्थायी समितीचे सभापती शारंगधर देशमुख, नगरसेविका स्वाती यवलुजे, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, साहाय्यक संचालक प्रसाद गायकवाड, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, आरोग्याधिकारी डॉ. दिलीप पाटील, प्रभारी जलअभियंता कुंभार, उपशहर अभियंता हर्षजित घाटगे, रावसाहेब चव्हाण, आर. के. जाधव, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, कामगार अधिकारी सुधाकर चल्लावाड, उपशहर रचनाकार नारायण भोसले, एन. एस. पाटील, आदी उपस्थित होते.* आठ दिवसांत खासगी कर्मचारी नियुक्ती* शिवाजी चौक ते गंगावेश रस्ता चार दिवसांत* अमृत योजनेचे काम बार चार्टप्रमाणे* बंदिस्त पार्किंगवर अधिक गतीने कारवाई 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरMuncipal Corporationनगर पालिका