थंब यंत्रणेला कर्मचाऱ्यांचा ठेंगाच

By Admin | Updated: August 18, 2014 21:35 IST2014-08-18T21:22:10+5:302014-08-18T21:35:14+5:30

पेठवडगाव नगरपालिका : मशिनची जोडणी होऊन सुद्धा अंमलबजावणी नाही

Employees' slingshot to thumb system | थंब यंत्रणेला कर्मचाऱ्यांचा ठेंगाच

थंब यंत्रणेला कर्मचाऱ्यांचा ठेंगाच

पेठवडगाव : जिल्ह्यात वडगाव नगरपालिकेने अनुक्रमाने सुमारे दोन वर्षांपूर्वी थंब मशिन बसविले होते. यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामात पारदर्शकता यावी यासाठी प्रशासनाने महत्वकांशी प्रकल्प राबविला होता. परंतु, या मशिनची जोडणी होऊन सुद्धा अंमलबजावणी झालेली नाही. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांची नेहमी प्रमाणे चंगळच सुरु आहे. हे कर्मचारी थंब पंच न करता उलटा ठेंगाच दाखवत असल्याची नागरिकांच्यातून चर्चा आहे.
वडगाव नगरपालिकेस शतकोत्तर रौप्यमहोत्सवी परंपरा आहे. पूर्वापार नोकरीसाठी राजकीय आशीवार्द असतो. त्यामुळे काही ठराविक कर्मचारी ‘आवो-जावो, घर तुम्हारा’ न्यायाने वागतात. तर काहीजण महिनोमहिने गायब असतात. काहीजण नेमके सही करण्याच्या वेळेत हजर राहून दांडी मारतात. अशा ठराविक कर्मचाऱ्यांच्या प्रवृत्तीमुळे पालिकेच्या प्रशासनाची बदनामी होत आहे. तर याचा फटका काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर बसतो. त्यांच्यावर कामाचा ताण येत असतो.यावर रामबाण तोडगा निघावा, आधुनिकतेचा स्वीकार करणाऱ्या मोजक्या नगरपालिकेप्रमाणे वडगाव पालिकेने धोरण स्वीकारले, कोल्हापूरच्या एम. जे. मल्टी सर्व्हिसेस १९ हजारात वर्षभर सेवा या तत्वावर बायोमेट्रिक टाईम फिंगर प्रिंट मशीन बसविले.
कर्मचाऱ्यांचा दररोजचा साप्ताहिक अहवाल प्रशासनास मिळणार होता. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांना याचा फटका बसणार होता. ही यंत्रणा सुरूच होवू नये यासाठी काहींनी प्रयत्न केल्याचा संशय आहे. त्यामुळे मशिन सुरू आहे, यंत्रणा मात्र बंद आहे. अशी परिस्थिती आहे.नगराध्यक्षा विद्या पोळ यांनी कर्मचाऱ्यांना शिस्त व कामाचे महत्व पटविण्यासाठी प्रबोधन के. तसेच काही कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड सक्ती लागू केली. त्यामुळे कामचुकार कर्मचाऱ्यांवर काही अंशी लगाम बसण्यास मदत झालेली आहे. दरम्यान या प्रश्नी पालिका सभेत ही प्रश्न उपस्थित झाला. थंब मशिन व सि. सी. टी कॅमेरे बसवावे अशी चर्चा झाली होती. मात्र सध्या तरी आहे ते थंब मशिन वापरावे अशी मागणी नागरिकांच्यातून होत आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Employees' slingshot to thumb system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.