महसूलमधील बदल्यांत कर्मचारी समाधानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST2021-08-12T04:28:58+5:302021-08-12T04:28:58+5:30
दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात एका विभागात तीन ते सहा वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या होतात. त्यासाठी एकूण कर्मचाऱ्यांच्या ...

महसूलमधील बदल्यांत कर्मचारी समाधानी
दरवर्षी एप्रिल, मे महिन्यात एका विभागात तीन ते सहा वर्षे पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियमित बदल्या होतात. त्यासाठी एकूण कर्मचाऱ्यांच्या २५ टक्के आणि विनंती बदल्या १० असे ३५ टक्क्यांपर्यंत बदल्या होतात. गेल्यावर्षी कोरोनामुळे फक्त १५ टक्के बदल्या करण्यात आल्या. यंदा राज्य शासनाने २५ टक्के बदल्यांना मान्यता दिली आहे. त्यानुसार महसूलमधील ११६ कर्मचाऱ्यांच्या बदलीचा आदेश मंगळवारी निघाला. यात मुख्यालयाच्या ठिकाणी ६ वर्षे पूर्ण केलेले २९ महसूल सहायक, १७ अव्वल कारकून, ३ वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले २६ अव्वल कारकून, मुख्यालयात ६ वर्ष काम केलेले १ व ३ वर्षांचा कालावधी पूर्ण केलेले १२ मंडल अधिकारी यांचा समावेश आहे.
या बदलीसाठी प्रत्येक कर्मचाऱ्याला १० पर्याय दिले होते. बहुतांशी कर्मचाऱ्यांनी इच्छेप्रमाणे बदली झाली आहे, काही कर्मचाऱ्यांना मात्र खूप लांबचे, अडचणीच्या ठिकाणचे तालुके मिळाल्याने नाराजी व्यक्त केली आहे. काहीजणांचे मूल लहान आहे, काहीजणांच्या कौटुंबिक अडचणी आहेत त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे विनंती केली आहे.
------