शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

corona virus : कर्मचारी पॉझिटिव्ह, बँकेचे काम बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 14:43 IST

Coronavirus, bankingsector, ratnagirinews खेड शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून या शाखेतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.

ठळक मुद्देकर्मचारी पॉझिटिव्ह, बँकेचे काम बंदखेडमधील प्रकाराने बँकेचे ग्राहक हैराण, आर्थिक व्यवहार ठप्प

खेड : शहरातील बँक ऑफ इंडिया शाखेतील कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने खबरदारी म्हणून या शाखेतील दैनंदिन व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र गैरसोय झाली.दरम्यान, पॉझिटिव्ह आलेला कर्मचारी अनेकांच्या संपर्कात आल्याची शक्यता असल्याने खेडमध्ये पुन्हा कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सर्दी, खोकल्याचा त्रास होत असलेल्या या कर्मचाऱ्याची कोरोना चाचणी करण्यात आली. त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, हा कर्मचारी तोपर्यंत बँकेमध्ये अनेकांच्या संपर्कात आल्याने आणखी काहीजण बाधित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्तीकडे वाटचाल करणारा खेड तालुका पुन्हा एकदा कोरोनाच्या विळख्यात तर अडकणार नाही ना? अशी भीती व्यक्त केली जात आहे. सकाळी बँकेचे ग्राहक नेहमीप्रमाणे बँकेत आर्थिक व्यवहारासाठी आले. मात्र, बँकेच्या प्रवेशद्वारावर बँकेत कोरोना पॉझिटिव्ह कर्मचारी सापडल्याने बँकेचे सर्व कामकाज बंद राहील असा सूचना फलक लावण्यात आला होता.

बँकेचे सर्व व्यवहार ठप्प राहिल्याने ग्राहकांची मात्र मोठी गैरसोय झाली. अखेर पैशाची निकड असलेल्या काही ग्राहकांनी थेट फुरूस येथील शाखेत हजेरी लावली. मात्र, तिथेही बीएसएनएलचे नेटवर्क नसल्याने ग्राहकांच्या पदरी निराशाच आली.खेड येथील बँकेची शाखा आणखी किती दिवस बंद राहणार, हे सूचना फलकावर नमूद केलेले नसल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम वाढला आहे. याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी शाखा व्यवस्थापक यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. बँकेने याबाबतची स्पष्ट कल्पना ग्राहकांना द्यावी आणि त्याचबबरोबर आता खबरदारीच्या सर्व उपाययोजनाही कराव्यात, अशी अपेक्षा ग्राहकांकडून केली जात आहे.

टॅग्स :Coronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉकRatnagiriरत्नागिरीKhedखेड