मंडलिक कारखान्याचा कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस मिळणार
By Admin | Updated: October 19, 2014 00:44 IST2014-10-19T00:44:02+5:302014-10-19T00:44:46+5:30
म्हाकवे : हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याने आपल्या

मंडलिक कारखान्याचा कर्मचाऱ्यांना २० टक्के बोनस मिळणार
म्हाकवे : हमीदवाडा (ता. कागल) येथील सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखान्याने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळीसाठी यंदा २० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे दिवाळीपूर्वीच बोनसची रक्कम संबंधित कर्मचाऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आली आहे. यासाठी कारखान्याने २ कोटी २० लाखांचा निधी उपलब्ध केला आहे.
कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांनी बॉयलर प्रदीपन कार्यक्रमप्रसंगी कामगारांना समाधानकारक बोनस दिवाळीपूर्वीच देण्याचे सुतोवाच केले होते. त्याप्रमाणे संचालक मंडळ, कामगार संघटना व कारखान्याचे प्रशासन यामध्ये चर्चा होऊन २० टक्केप्रमाणे बोनस वाटप करण्याचे निश्चित होऊन त्याची त्वरित अंमलबजावणीही करण्यात आली.
कारखान्याकडे कायम व हंगामी कायम असणाऱ्यांना २० टक्के, तर कंत्राटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रत्येकी एक महिन्याचा पगार बोनस म्हणून अदा करण्यात आला आहे. याबाबत कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष मंडलिक, संचालक प्रा. संजय मंडलिक, कार्यकारी संचालक पी. जे. चिटणीस, चीफ अकौटंट एम. वाय. पाटील यांच्यासह सर्व संचालक मंडळाचे, संघटनेचे उपाध्यक्ष विजय खराडे उपस्थित होते. सचिव आनंदराव वाळेकर यांनी आभार मानले. (वार्ताहर)