गडहिंग्लजमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अडथळ्यांची अडचण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:46+5:302021-05-12T04:25:46+5:30
शहरातील वीरशैव बँक ते गडहिंग्लज हायस्कूल हा रस्ता बंद करण्यात आला आहे. एम. आर. हायस्कूलजवळील वडरगे रोड ते कडगाव ...

गडहिंग्लजमध्ये आपत्कालीन परिस्थितीत अडथळ्यांची अडचण
शहरातील वीरशैव बँक ते गडहिंग्लज हायस्कूल हा रस्ता बंद करण्यात आला आहे. एम. आर. हायस्कूलजवळील वडरगे रोड ते कडगाव रोडला जोडणारा रस्ता, पिराजी पेठ, मांडेकर गल्ली हा मार्गही अडथळे लावून बंद केला आहे.
प्रशासनाने बंद केलेले हे मार्ग शहरातील मुख्य रस्ते आहेत. उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर व शेंद्री माळावरील कोविड सेंटर तसेच अन्य खासगी कोविड केंद्रावर जाण्यासाठी हे प्रमुख मार्ग आहेत. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत एखादा रुग्ण कोवीड केंद्रावर वेळेत पोहोचला पाहिजे. त्यासाठी या मार्गावरील अडथळे हटवण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.
--------------------------
फोटो ओळी : कडक लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बाहेरून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनांवर नजर ठेवण्यासाठी गडहिंग्लज-वडरगे रोडवर पोलिसांनी बॅरिकेड्स उभारून मार्ग बंद केले आहेत. त्यामुळे रुग्णवाहिकेलाही अन्य मार्गाचा शोध घ्यावा लागला. (मज्जीद किल्लेदार)
क्रमांक : ११०५२०२१-गड-०८