उदगावात कोरोनाचा संसर्ग थांबेना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:19 IST2021-06-01T04:19:00+5:302021-06-01T04:19:00+5:30

उदगाव : येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने गावातील नागरिकांना हैराण केले आहे. गावातील ...

Emergence does not stop corona infection | उदगावात कोरोनाचा संसर्ग थांबेना

उदगावात कोरोनाचा संसर्ग थांबेना

उदगाव : येथे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेने गावातील नागरिकांना हैराण केले आहे. गावातील रुग्णाची संख्या दोनशेच्या वर पोहोचली आहे. एवढ्या रुग्णसंख्येने प्रशासनावर मोठा ताण दिसून येत आहे. नागरिकांनी आता कडक नियमावलीचे पालन करावे, ही प्रशासनाची नाममात्र अपेक्षा आहे.

उदगाव येथे कोरोनाने हाहाकार माजविला आहे. गावात सद्य:स्थितीत २१६ रुग्ण आहेत. यातील १५० रुग्ण बरे झाले असून बारा जणांचा मृत्यू झाला आहे. औषध फवारणी, गावातील शाळेत अलगीकरण कक्ष, रुग्णांना बेड उपलब्ध करून देणे अशी कामे ग्रामसमिती करत आहे. समितीने गावातील व्यवहारावर कडक पावले घालूनही रुग्णांचा आकडा कमी येत नसल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागरिकांनी आता स्वयंस्फूर्तेने निर्बंध घालून घ्यावेत व शासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

------------

कोट - गावात रुग्ण वाढत आहेत. त्यावर उपाययोजना म्हणून आम्ही ग्रामसमितीच्या माध्यमातून प्रयत्न करत आहोत. परंतु नागरिकांनी शासनाच्या धोरणांची कडक अंमलबजावणी करावी. रुग्णवाढ रोखण्यासाठी गावातील खासगी डॉक्टरांच्या पथकाला सोबत घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

- कलीमुन नदाफ, सरपंच

Web Title: Emergence does not stop corona infection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.