वारणा दूध संघामार्फत भ्रूणप्रत्यारोपण कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:16 IST2021-07-03T04:16:11+5:302021-07-03T04:16:11+5:30
वारणानगर : येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) यांच्यावतीने दूध उत्पादकांच्या अतिउच्च ...

वारणा दूध संघामार्फत भ्रूणप्रत्यारोपण कार्यक्रम
वारणानगर : येथील श्री वारणा सहकारी दूध उत्पादक संघ व राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड (एनडीडीबी) यांच्यावतीने दूध उत्पादकांच्या अतिउच्च दूध क्षमता असणाऱ्या सिद्ध वळूच्या विर्यमात्रा देण्यात आली. या गायींच्या गर्भाशयात एका पेक्षा जास्त गर्भ/भ्रूण तयार करून ते भाडोत्री माता (रिसेपेंट गायी)मध्ये यशस्वीरित्या प्रत्यारोपण करण्यात आले.
राष्ट्रीय डेअरी विकास बोर्ड कार्यक्रमाचे प्रमुख डॉ. एस. पी. सिंग, डॉ. एस. आर. पाटील व डॉ. कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली वारणा दूध संघाच्या पशुवैद्यकीय विभागामार्फत भ्रूणप्रत्यारोपण कार्यक्रम झाला.
वारणा दूध संघाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे, कार्यकारी संचालक मोहन येडूरकर यांनी विविध योजनांबद्दल मार्गदर्शन केले. संघातील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. जे. बी. पाटील, डॉ. नागेश वडजे, डॉ. अशोक कोटगिरे, संकलन व्यवस्थापक डॉ. अशोक पाटील यांनी भ्रूणप्रत्यारोपण कार्यक्रमाची माहिती दिली.
या वेळी संघाचे उपाध्यक्ष एच. आर. जाधव, जिल्हा परिषद सदस्य शिवाजीराव मोरे, संचालक शिवाजीराव कापरे, अभिजित पाटील, शिवाजीराव जंगम, प्रदीप देशमुख, के. आर. पाटील, महेंद्र शिंदे, डॉ. व्ही. टी. पाटील, राजवर्धन मोहीते, एन. आर. पाटील, माधव गुळवणी, लालासो पाटील, डॉ. मिलिंद हिरवे, अरुण पाटील, मयूर पाटील, चंद्रशेखर बुवा तसेच अकौंट्स ऑफिसर सुधीर कामेरीकर, श्रीधर बुधाळे, शरद शेटे उपस्थित होते.