शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
कोल्हापुरकरांचा नादच खुळा! वनताराचे पथक दुसऱ्यांदा दाखल, महास्वामींची भेट घेणार
3
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
4
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
5
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
6
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
7
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
8
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
9
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
10
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
11
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
12
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
13
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
14
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
15
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
16
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
17
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
18
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
19
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
20
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?

अडकूर येथील सेवासंस्थेत १ कोटी ४६ लाखांचा अपहार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2020 17:49 IST

अडकूर (ता. चंदगड) येथील सेवासंस्थेत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख पाच हजार ४९७.७० रुपयांचा अपहार झाला आहे. याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.

ठळक मुद्देअडकूर येथील सेवासंस्थेत १ कोटी ४६ लाखांचा अपहारअध्यक्ष, बँक निरिक्षकासह १६ जणांवर चंदगड पोलिसात गुन्हा दाखल  

चंदगड : अडकूर (ता. चंदगड) येथील सेवासंस्थेत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१ ९ या आर्थिक वर्षात १ कोटी ४६ लाख पाच हजार ४९७.७० रुपयांचा अपहार झाला आहे. याबाबतची फिर्याद चंदगड येथील लेखापरिक्षक नामदेव सरनोबत यांनी चंदगड पोलिसात दिली आहे.

विद्यमान अध्यक्ष, उपााध्यक्ष, संचालक, संचलिका, बँक निरिक्षक, बँक शाखाधिकारी अशा एकूण १६ जणांविरोधात चंदगड पोलिसात गुन्हा नोंद झाला आहे.

अडकूर (ता. चंदगड ) येथील सेवा संस्थेतील सभासदांच्या खोट्या नोंदी व खोट्या सह्या करून कर्जरोखे न घेता पोकळ कर्ज नावे टाकण्यात आले आहे. त्यातून रोख शिल्लक कमी करून ५० लाख ९४ हजार ८५० रुपयांची उचल करण्यात आली. त्याशिवाय खोटे रेकॉर्ड तयार करून ६७ लाख रुपये आणि सभासद कर्जाच्या येणे यादीमध्ये फरकाची रक्कम २८ लाख १० हजार ४९७ रुपये ७० पैसे दर्शवून तो अपहार केला आहे. अपहाराची एकूण रक्कम १ कोटी ४६ लाख ५ हजार ४९७ रुपये ७० पैसे होते.बोगस मेंबर कर्ज, खावटी कर्ज, कर्जावील व्याज न घेता बंद केलेली रक्कम, सभासदांच्या ठेवीची रक्कम सभासदांच्या सह्या न घेता उचल, खर्चाचे बिल व्हौचर्स न घेता इतर खर्चावरील रकमा अशी एकूण १कोटी ४६ लाख पाच हजार ४९७ रुपये ७० पैसे संस्था रोजकिर्दीच्या जमा रकमेच्या हात शिल्लकेतून बँक चालू खातेस प्रत्यक्ष भरणा न करता फक्त किर्दीला पोकळ जमा खर्च केलेला आहे. तथापि त्यांचे भरणा काँन्टर तपासणीला उपलब्ध न झाल्यामुळे बँकेचा खाते ऊतारा मागवून वेळ घेतले असता सदर बँक चालू खातेस खर्ची पडललेल्या रकमा बँक खात्यास भरणा केलेचे दिसून येत नाहीत.

कर्जावरील व्याज न घेणे, सभासदांच्या नावावर बोगस कर्ज टाकून, मेंबर ठेव व खर्च व्हौचर्स नांवे टाकून संस्था हातशिल्लक घटविणेत आलेली आहे. संस्थेच्या सर्व रक्कमेचा आपल्या खासगी कारणासाठी वापर करुन संस्था सभासदांची फसवणुक करून सभासदांचा विश्वासघात केला आहे व संस्थेच्या सार्वजनिक निधीचा अपहार केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी संस्थेचे अध्यक्ष अशोक जाधव, उपाध्यक्ष दत्तात्रय देसाई, संचालक जगन्नाथ इंगवले, संतू गुरव, नारायण इंगवले, सिध्दोजी देसाई, राजाराम घोरपडे, प्रकाश इंगवले, उत्तम चिलगोंडे, महादेव नाईक, मीना शिंदे, रंजना कबाडे, लिपिक कादर कोवाडकर, सचिव पुंडलिक घोळसे यांच्यासह जिल्हा बँकेचे शाखाधिकारी आनंदा कांबळे ( रा. हाळोली ता. आजरा ) जिल्हा बॅँक अडकूर शाखेचे निरिक्षक दादु हसन मुल्ला (रा. गडहिंग्लज ) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक सहाय्यक फौजदार जमादार तपास करत आहेत .

टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीkolhapurकोल्हापूरchandgad-acचंदगड