जीएसटी कायद्यातील त्रुटी दूर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 07:02 IST2021-02-05T07:02:44+5:302021-02-05T07:02:44+5:30
जयसिंगपूर : जीएसटी कायदा लागू होऊन चार वर्षे झाली; परंतु कायद्यात सतत केल्या जाणाऱ्या बदलामुळे व अंमलबजावणीतील त्रुटीमुळे व्यापारी, ...

जीएसटी कायद्यातील त्रुटी दूर करा
जयसिंगपूर : जीएसटी कायदा लागू होऊन चार वर्षे झाली; परंतु कायद्यात सतत केल्या जाणाऱ्या बदलामुळे व अंमलबजावणीतील त्रुटीमुळे व्यापारी, सीए, कर सल्लागार व अकौंटंट त्रस्त झाले आहेत. त्यामुळे जीएसटी कायदा सोपा करावा व अंमलबजावणीतील त्रुटी दूर कराव्यात, अशी मागणी जयसिंगपूर टॅक्स कन्सल्टंट व अकौंटंट असोसिएशनच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर व केंद्रीय जीएसटी कार्यालय अधीक्षक नवीन भास्कर यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यावेळी जयसिंगपूर टॅक्स कन्सल्टंट असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. जी. एम. बजाज, सुदर्शन कदम, रावसाहेब जगदाळे, बी. टी. नाईक, गंगाभीषण पंपालिया, प्रमोद गावडे, विवेक करमुसे, सूरज मोणे, प्रमोद देशिंगे, मोहसीन पेंढारी, सोमनाथ कांबळे, विद्यासागर बस्तवाडे, गौरव माने, रघुनाथ पुजारी, इम्रान शेख, संजय चिकोडे, गुरुनाथ कुलकर्णी उपस्थित होते.
फोटो - २९०१२०२१-जेएवाय-०७
फोटो ओळ - जयसिंगपूर टॅक्स कन्सल्टंट व अकौंटंट असोसिएशनच्यावतीने आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.