पात्र यंत्रमाग घटकांनी २ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:31 IST2021-09-08T04:31:50+5:302021-09-08T04:31:50+5:30
इचलकरंजी : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण सन २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योगातील ज्या घटकांना वीजदर सवलत लागू केली आहे, अशा पात्र असणाºया ...

पात्र यंत्रमाग घटकांनी २ सप्टेंबरपर्यंत नोंदणी करावी
इचलकरंजी : राज्याच्या वस्त्रोद्योग धोरण सन २०१८-२३ अंतर्गत वस्त्रोद्योगातील ज्या घटकांना वीजदर सवलत लागू केली आहे, अशा पात्र असणाºया घटकांना २ सप्टेंबरच्या शासन निर्णयानुसार आॅनलाईन नोंदणी करण्याची एक महिन्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
वस्त्रोद्योग धोरणांतर्गत वीजदर सवलतीस पात्र असणाºया यंत्रमाग घटकांना आॅनलाईन नोंदणी करण्याची अंतिम मुदत २८ फेब्रुवारी २०२१ पर्यंत दिली होती. त्यानंतर यंत्रमाग संघटनांच्या मागणीनुसार ३१ मेपर्यंत वाढविली. मात्र, या मुदतीतदेखील नोंदणी न केल्याने २५ फेब्रुवारी २०२१ अन्वये २७ अश्वशक्तीपेक्षा कमी जोडभार असलेल्या घटकांना आॅनलाईन किंवा आॅफलाईन नोंदणीची मुभा दिली. २ सप्टेंबरपर्यंत संबंधित यंत्रमाग घटकांनी अर्ज केला नाही, तर नोंदणी करूपर्यंत वीज सवलत बंद करण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत. त्यामुळे संबंधित यंत्रमाग घटकांनी मुदतीत आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन किंवा आॅफलाईन नोंदणी करावी, असे आवाहन पॉवरलूम असोसिएशनने केले आहे.