शहरं
Join us  
Trending Stories
1
तत्कालीन CJI ने मोजक्या कर्मचाऱ्यांना दिलं होतं सहा-सहावेळा इन्क्रीमेंट; आता सुप्रीम कोर्टाने निर्णय मागे घेतला
2
"स्वप्नातही विचार केला नव्हता..."; ४ वेळा आमदार राहिलेल्या नितीन नबीन यांना भाजपाचं 'सरप्राइज'
3
बाजाराची नकारात्मक सुरुवात! सेन्सेक्स-निफ्टी लाल निशाणीवर; 'या' समभागांना मोठा फटका
4
Priyanka Gandhi Prashant Kishor: बिहार निकालाने झटका! प्रशांत किशोरांनी अचानक घेतली प्रियंका गांधींची भेट
5
जीएसटी कपातीचा आनंद संपल्यात जमा...! नवीन वर्षात ‘महागाईचा झटका’! टीव्ही, कार, स्मार्टफोनच्या किंमती १० टक्क्यांनी वाढणार
6
Kandivali Crime: कांदिवलीत गुंडांचा माज! कॉलर पकडली, वर्दी खेचत पोलिसांना मारहाण; कशामुळे झाला राडा?
7
सिडनी हल्ल्याला नवं वळण, पाकिस्तानी कनेक्शन आलं समोर; दहशतवादी बाप-लेकानं मिळून केला गोळीबार
8
'धुरंधर' अक्षय खन्नाच्या सावत्र आईची प्रतिक्रिया; म्हणाली, "मी कधीच त्याची आई झाले नाही कारण..."
9
काऊंटडाऊन सुरू, उरले १०३ दिवस! वैभव सुर्यवंशीला टीम इंडियात येण्यापासून कोणी रोखू शकणार नाही... कसे...
10
विद्यार्थ्यांना शारीरिक अन् मानसिक शिक्षा देण्यावर बंदी; शिक्षण विभागाने जारी केली नवी नियमावली
11
"वेदनेतून घेतलेला निर्णय, तुमच्या विश्वासाला..."; तेजस्वी घोसाळकरांचं शिवसैनिकांना भावनिक पत्र
12
आज एक चमकणारी एसयुव्ही लाँच होणार; इंटरनेट कनेक्टेड, मोठी टचस्क्रीन सह बरेच काही मिळणार...
13
Crime: आधी पाच मुलांना गळफास लावला, नंतर बापानेही संपवले आयुष्य; दोन मुले वाचली
14
Viral Video: लग्नाआधी तरुणी एक्स बॉयफ्रेंडला जाऊन भेटली, व्हिडीओ सोशल मीडिया तुफान व्हायरल; पण गोष्ट खरी आहे का?
15
'धुरंधर'मधील व्हायरल गाण्यावर शाहरुखनेही केला डान्स? Video व्हायरल; किंग खानचे 'जबरा फॅन' म्हणाले...
16
BMC निवडणुकीच्या तोंडावर मुंबईत उद्धव ठाकरेंना धक्का; बड्या महिला नेत्याचा भाजपात प्रवेश होणार
17
'शक्तिपीठ'च्या मार्गात बदल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक घोषणा म्हणाले, अब आगे बढ़ चुका हूँ मैं... 
18
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य,१५ डिसेंबर २०२५: नशिबाची मिळणार साथ, आज सर्वत्र लाभच लाभ 
19
२ गोळ्या झेलूनही दहशतवाद्याकडून हिसकावली बंदूक; अखेर कोण आहे सिडनीतील हा 'Brave Man'?
20
फुटबॉलचा किंग अन् क्रिकेटचा देव एकाच व्यासपीठावर! वानखेडेवर '१०'ची जादू
Daily Top 2Weekly Top 5

नोकऱ्यांच्या खासगीकरणविरोधात कोल्हापुरात ‘वंचित बहुजन’चा एल्गार

By सचिन भोसले | Updated: October 5, 2023 17:46 IST

कोल्हापूर : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण करून कंत्राटी नोकरभरती करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. हा निर्णय युवकांचे भविष्य ...

कोल्हापूर : राज्यात शासकीय नोकऱ्यांचे खासगीकरण करून कंत्राटी नोकरभरती करण्याचा अध्यादेश राज्य शासनाने काढला आहे. हा निर्णय युवकांचे भविष्य उद्धवस्त करणारा आहे. त्यामुळे हा आदेश तत्काळ रद्द करावा. यासह अन्य मागण्यांसाठी वंचित बहुजन युवा आघाडीच्यावतीने गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी स्विकारले.राज्य शासनाने शासकीय नोकऱ्यांचे खाजगीकरण करून कंत्राटी नोकर भरतीचे अध्यादेश काढले आहेत. ते त्वरीत रद्द करावेत. यासह राज्यातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्वच माध्यमांच्या शाळांसाठी दत्तक शाळा योजना अंतर्गत राज्यातील ६२ हजार शाळांचे खाजगीकरणाचा शासन निर्णय आहे. भारतीय राज्य घटनेच्या कलम ४५ नूसार मोफत व सक्तीचे शिक्षणाचा अधिकार असताना हे सरकार खासगीकरण करून विद्यार्थी पालकांची पिळवणूक करण्याचा घाट घालत आहे. हा निर्णय मागे घेवून सरकारनेच ही व्यवसथा करावी. केंद्र शासनाची भरती केंद्रीय लोकसेवा आयोगाप्रमाणे केली जाते. त्याप्रमाणेच राज्यातील नोकरभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फ करावी. स्पर्धा परीक्षांचे शुल्क ९०० ते १००० रूपये इतके आहे. ते कमी करून सर्वच परीक्षांचे शुल्क १०० रूपये करावी. बार्टी, महाज्योती, सारथी व परदेशात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणारी शिष्यवृत्ती वेळेत द्यावी. पेठवडगाव प्रस्तावित शहर विकास आराखडा हा चुकीच्या आराखडा रद्द करावा. तळसंदेतील मागासवर्गीय अल्पवयीन मुलीस फुस लावून पळवून नेणाऱ्या सराईत गुन्हेगारावर त्वरीत कारवाई करावी. आदी मागण्यांचा समावेश निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात होता.या मोर्चाची सुरुवात दुपारी एक वाजता दसरा चौकतून झाली. दसरा चौकात राजर्षी शाहू महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून हा मोर्चा व्हीनस काॅर्नर- असेम्बली रोड, जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचला. उपस्थित कार्यकर्त्यांनी खासगीकरणाविरोधात घोषणांनी परिसर दणाणून सोडला. यावेळी युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष मिलिंद सनदी, दिपक कांबळे, आकाश कांबळे, दशरथ दिक्षांत, मनिषा कांबळे, तुषार कांबळे, सुरेश जाधव आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरVanchit Bahujan Aaghadiवंचित बहुजन आघाडी