तिसऱ्या दिवशी ११२२ जणांचा अकरावी प्रवेश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:25 IST2020-12-06T04:25:33+5:302020-12-06T04:25:33+5:30
कोल्हापूर : अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शनिवारी तब्बल ११२२ जणांनी प्रवेश निश्चित केला. तीन दिवसांत प्रवेश घेतलेल्यांची संख्या ...

तिसऱ्या दिवशी ११२२ जणांचा अकरावी प्रवेश
कोल्हापूर : अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर शनिवारी तब्बल ११२२ जणांनी प्रवेश निश्चित केला. तीन दिवसांत प्रवेश घेतलेल्यांची संख्या २८१७ वर पोहोचली आहे.
कोरोना व लॉकडाऊननंतर गुरुवारपासून केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. पहिल्या दिवशी ६६२ जणांनी प्रवेश घेतला. शुक्रवारी हाच आकडा १०३३ वर पोहोचला. शनिवारी यात आणखी भर पडून ही संख्या ११२२ वर पोहोचली. यात सर्वाधिक ६०० प्रवेश विज्ञान शाखेसाठी झाले, तर ८ प्रवेश हे इंग्रजी माध्यमातील कला शाखेसाठी झाले.
आतापर्यंत एकूण झालेल्या प्रवेशापैकी २८१७ प्रवेश निश्चित झाले. यात १४६० सर्वाधिक प्रवेश विज्ञान शाखेचे, ५१३ प्रवेश मराठी माध्यमातील कॉमर्स शाखेचे, तर ५०३ प्रवेश मराठी माध्यमातील कला शाखेचे झाले आहेत. ३१५ प्रवेश हे इंग्रजी माध्यमातील काॅमर्स शाखेचे आहेत.