शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Kolhapur: मुरगूडमध्ये पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, अकरा जणांचा घेतला चावा; मतदानादिवशीच घटना घडल्याने गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2025 14:38 IST

मुरगूड : मुरगूड येथे नगरपरिषदेचे मतदान शांततेत सुरू असताना मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने तब्बल अकरा ...

मुरगूड : मुरगूड येथे नगरपरिषदेचे मतदान शांततेत सुरू असताना मुख्य बाजारपेठेत पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घातला. या कुत्र्याने तब्बल अकरा जणांचा चावा घेतला असून यात काहीजण गंभीर जखमी झाले. जखमींवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ही घटना घडताच काही उमेदवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची चौकशी केली. या घटनेने काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.नगरपालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडत असल्याने मुरगूड बाजारपेठेत गर्दी होती. दरम्यानच, राजीव गांधी चौकात पिसाळलेला कुत्रा नागरिकांच्या अंगावर जात होता. परिसरात तब्बल अकरा जणांचा या कुत्र्याने चावा घेतला. यामध्ये विठ्ठल दशरथ वायदंडे (वय १९), विश्वजीत उमाजी वायदंडे (रा. मळगे), आशिष बाळासाहेब देवळे (२८), कमल रघुनाथ सूर्यवंशी (७५), राजाराम बळवंत कडवे (६०), नंदिनी गजेंद्र भोसले (१४), कमल तानाजी चित्रकार (४२), रसिका आंबिदास गोंधळी(१५), बापू इलाप्पा कांबळे (६५), संगीता शिवाजी चांदेकर (५५), समीक्षा शंकर पाटील (१५, सर्व रा. मुरगुड) हे जखमी झाले. काही जणांच्या जखमा खोलवर आहेत. यातील काही रुग्णांवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापूरला पाठवले आहे. यावेळी काही उमेदवारांनी रुग्णालयात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. ही घटना समजताच अनेकांनी त्या कुत्र्याचा पाठलाग केला. काहींनी लोकांना आरडाओरडा करून सावध केले शेवटी काही तरुणांनी या कुत्र्याचा बंदोबस्त केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Kolhapur: Rabid dog attacks Murugud, injures eleven on voting day.

Web Summary : A rabid dog created chaos in Murugud during voting, biting eleven people. Some victims were seriously injured and hospitalized. The incident caused a stir, with candidates visiting the injured.