अकरा महिन्यांच्या अनुश्रीच्या आयुष्याची दोरी झाली बळकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:17 IST2021-06-23T04:17:01+5:302021-06-23T04:17:01+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : जन्मानंतर पाचव्याच महिन्यात आईचे छत्र हरपल्याने आजीच्या कुशीत जग पाहणाऱ्या अनुश्रीला वयाच्या अवघ्या ...

Eleven months of Anushree's life was strengthened | अकरा महिन्यांच्या अनुश्रीच्या आयुष्याची दोरी झाली बळकट

अकरा महिन्यांच्या अनुश्रीच्या आयुष्याची दोरी झाली बळकट

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : जन्मानंतर पाचव्याच महिन्यात आईचे छत्र हरपल्याने आजीच्या कुशीत जग पाहणाऱ्या अनुश्रीला वयाच्या अवघ्या अकराव्या महिन्यातच हृदयशस्त्रक्रियेला सामोरे जावे लागले. कोल्हापुरातील कार्डियाक सर्जन डॉ. अर्जुन आडनाईक यांनी तिच्यावर गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून तिच्या आयुष्याची दोरी पुन्हा एकदा बळकट केली. विशेष म्हणजे या शस्त्रक्रियेसह अकरा दिवसांच्या जेवण, राहण्याची सोयदेखील मोफतच करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर डॉक्टरांच्या रूपात देवदूतच भेटल्याची भावना व्यक्त करताना वृद्ध आजीच्या डोळ्यात अश्रू तरळले.

अनुश्री किरण पवार, वय वर्षे ११ महिने, रा. कोयना वसाहत, कऱ्हाड, हिचा जन्म मश्चिंद्रगड इथे झाला. जन्मताच तिचे वजन फक्त दोन किलोच होते. बाळ सारखे आजारी पडत असल्याने तपासणी केली असता हृदयाचा आजार असल्याचे कळले. बाळाचे वजन कमी असल्याने शस्त्रक्रियेसाठी मुंबईला जाण्याशिवाय पर्याय नव्हता. त्यातच कोरोना प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन असल्याने महामार्ग बंद, वाहतुकीची व्यवस्था नाही, जवळ आधार देणारं कुणीच नाही. अशावेळी आजीला शेजारच्या रहिवाशांनी दिलेल्या सल्ल्यानंतर आजी बाळाला घेऊन कोल्हापुरात स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये डॉ. आडनाईक यांच्याकडे उपचारासाठी दाखल झाली. अवघ्या काही दिवसांतच तिच्या नातीला जीवदान मिळाले. राहण्यापासून जेवण, चहा, नाश्टा, इतकंच नाही तर बाळाच्या दुधापासून तिला सकस आहार देण्यापर्यंतचा तसेच औषधांचा सर्व खर्च हॉस्पिटलमार्फत मोफत करण्यात आला.

प्रतिक्रिया

मुलाचा जन्म होण्यापूर्वी, गर्भाच्या रक्तास ऑक्सिजन मिळण्यासाठी फुप्फुसांमध्ये जाण्याची आवश्यकता नसते. डक्टस आर्टेरिओसस एक अतिरिक्त धमनी आहे, ज्यामुळे रक्त फुप्फुसांमधील रक्ताभिसरण वगळता येते. बाळाचा जन्म होतो तेव्हा रक्तास फुप्फुसांमध्ये ऑक्सिजन मिळणे आवश्यक आहे आणि ही अतिरिक्त धमनी बंद होणे अपेक्षित आहे; पण होत नसल्याने पीडीएमध्ये डिव्हाइस स्थापित करून आतील बाजूने बंद केले. शस्त्रक्रियेनंतर अनुश्रीची प्रकृती चांगली असून, तिला आता कोणताही धोका नाही.

डॉ. अर्जुन आडनाईक

फोटो: २२०६२०२१-कोल-अनुश्री

फोटो ओेळ : कोल्हापुरातील स्वस्तिक हॉस्पिटलमध्ये हृदयावरील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया डॉ. अर्जुन आडनाईक यांनी यशस्वी केल्यानंतर अकरा महिन्यांची कऱ्हाडची अनुश्री आजीच्या कुशीत अशी विसावली.

Web Title: Eleven months of Anushree's life was strengthened

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.