अकरा मजलीचा मार्गच खुजा

By Admin | Updated: August 11, 2014 00:44 IST2014-08-11T00:41:25+5:302014-08-11T00:44:23+5:30

निकष बदलण्याची मागणी : दोन हजार चौरस फुटांच्या जागांची कमतरता

The eleven floored route is clean | अकरा मजलीचा मार्गच खुजा

अकरा मजलीचा मार्गच खुजा

संतोष पाटील -कोल्हापूर -- शासनाने कोल्हापूरच्या विकास नियंत्रण नियमावलीत बदल करून इमारतींची उंची २१ मीटरवरून ३५ मीटरपर्यंत (११ मजली) उंच करण्यास परवानगी दिली. या निर्णयानंतर मुंबई, पुणे, नाशिकनंतर कोल्हापुरात उंच इमारती दिसतील अशी आशा होती. मात्र, सध्या दोन इमारती वगळता शहरातील इमारती त्यामाने खुज्याच राहिल्या. ११ मजल्यांसाठी असणारे निकष बदलण्याची मागणी बांधकाम व्यावसायिकांतून होत आहे.
अकरा मजल्यांच्या नव्या निकषांने बहुमजली इमारतींमुळे शहर देखणेपणात वाढेल. शहर आडवे वाढण्यास मर्यादा, उभे वाढल्याने जागांचे दरही आवाक्यात येतील, अशी आशा होती. मात्र, ११ मजलींला किमान दोन हजार चौ. मीटर जागेची गरज आहे. मूळ गावठाण वगळून ११ मजली इमारतीस परवानगी दिली. मूळ शहराचा ८० टक्केभाग हा गावठाणात आहे. दोन हजार चौ. मीटरच्या जागाच कमी असल्याने या इमारतींवर मर्यादा असल्याचे बांधकाम क्षेत्राचे मत आहे.

अकरा मजल्यांसाठी नियमावली
महालक्ष्मी किरणोत्सव मार्गावरील इमारतींसाठी ३५ मीटरची
परवानगी नाही
१ एफएसआयच परवागी, बिल्टअप एरियात कोणतीही वाढ नाही
१ हजार स्के. फूट जागेवर
२४ मी. उंच इमारत
दीड हजार स्के. फूट जागेवर
३० मी. उंच इमारत
दोन हजारच्या पुढे स्के. फूट जागेवर ३५ मी. उंच इमारत
मनपाच्या फायर कॅपिटेशनमध्ये
५ रुपयांवरून १५ रुपये प्रति
चौरस मीटर वाढ

मनपाला अग्निशमन दल सक्षम करावा लागणार
बाल्कनीच्या मर्यादेत ५ टक्के वाढ
गावठाणमध्ये ११ मजलीला परवानगी नाही.
शहरात ८० टक्के जागा गावठाणातील
११ मजली इमारती भोवतालची
८० टक्के जागा खुली राहणार
बगीचा, वृक्ष लागवड व दोन इमारतींमध्ये मोकळी जागा
शहर हद्दवाढीनंतरच मोठ्या प्रमाणात ११ मजली
इमारतीस चालना

११ मजली इमारतींसमोर १२ मीटर रस्ता आवश्यक
या इमारतींमध्ये अत्याधुनिक लिफ्टसह व अग्निशमन यंत्रणा आवश्यक
अत्याधुनिक सोयी व नव्या निकषांमुळे या इमारती काहीशा महागड्या
गावठाण व्यतिरिक्त असलेल्या जुन्या इमारतींना निकष पूर्ण केल्यानंतरच परवानगी
दोन वर्षांत ७-८ इमारतींच
११ मजली

अकरा मजली इमारतींमुळे शहरच्या सौंदर्यात भर पडते. अकरा मजल्यांपर्यंत बांधकाम हे खर्चिक असते. कोल्हापूर शहराची भौगोलिक स्थिती व अकरा मजल्यांसाठी असणारे निकष यामुळे अकरा मजली इमारतींवर बंधने आहेत. रेडझोनमधील अकरा मजल्यांसाठी असणारी बंधने उठविणे गरजेचे आहे. मात्र, भविष्यात अशीच परिस्थीती राहणार नाही. कोल्हापुरातही मोठ्या प्रमाणात अकरा मजली इमारती उभ्या राहतील.
- गिरीश रायबागे,
अध्यक्ष- कोल्हापूर क्रीडाई

Web Title: The eleven floored route is clean

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.