शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

दुर्गा दौडच्या मार्गावर टिपू सुलतानचे उदात्तीकरण, कोल्हापुरातील कसबा बावड्यात तणाव

By उद्धव गोडसे | Updated: October 16, 2023 12:38 IST

समाज कंटकांवर कारवाई करण्याची तरुणांची मागणी, पोलिस बंदोबस्त वाढवला

कोल्हापूर : टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारा स्टेटस सोशल मीडियात ठेवून धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याबद्दल चार दिवसांपूर्वीच पोलिसांनी एका संशयिताला कसबा बावड्यातून अटक केली होती. त्यानंतर सोमवारी (दि. १६) सकाळी दुर्गा दौडच्या मार्गावर अज्ञातांनी टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारा मजकूर लिहिल्याचे आढळल्याने प्रचंड तणाव निर्माण झाला. कसबा बावडा येथील शुगर मिल गाडी अड्डा येथे ही घटना घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, दरवर्षी नवरात्रोत्सवात तरुणांकडून कसबा बावड्यात दुर्गा दौडचे आयोजन केले जाते. सोमवारी सकाळी राजाराम साखर कारखाना परिसरातील गाडी अड्ड्याजवळ दुर्गा दौड पोहोचली असता, रस्त्यावर आक्षेपार्ह मजकूर लिहिला असल्याचे तरुणांना दिसले. टिपू सुलतान याला हिंदुस्थानचा बादशहा ठरवणारा मजकूर पाहून संतप्त तरुणांनी पोलिसांना बोलवले. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने मजकूर पुसून तरुणांना दुर्गा दौड शांततेत पूर्ण करण्याचे आवाहन केले. मात्र, संतप्त तरुणांनी भगवा चौकात एकत्र येऊन घटनेचा निषेध नोंदवत समाजकंटकांच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी केली. तसेच जोरदार घोषणाबाजी केली. शहर पोलिस उपअधीक्षक अजित टिके, पोलिस निरीक्षक अजितकुमार सिंदकर यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्याने तणाव निवळला. दुपारी बारापर्यंत शेकडो तरुण भगवा चौकात ठाण मांडून बसले होते. टिपू सुलतानचे उदात्तीकरण करणारा मजकूर रस्त्यावर लिहिणा-या संशयितांचा शोध सुरू आहे. याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटू नयेत, यासाठी खबरदारी घेतली जात असल्याची माहिती उपअधीक्षक टिके यांनी दिली.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस