शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

कोल्हापूरच्या ४३ व्या विज्ञान प्रदर्शनात प्राथमिक १३५, माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 11:48 IST

शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आयोजित ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार होते.

ठळक मुद्देकोल्हापूर ४३ व्या शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटनजिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ : वसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील

कोल्हापूर : चांगल्या गुणांसह मुलांनी आपल्यातील जिज्ञासावृत्ती जागृत केली पाहिजे. प्रत्येक गोष्टीबाबत तुम्हाला प्रश्न पडलाच पाहिजे, हे असे का? कारण जिज्ञासा हे ज्ञानाचे मूळ आहे. त्यामुळे परिपूर्ण ज्ञान मिळविण्यासाठी तुमच्यातील जिज्ञासावृत्ती जागृत करा, असे आवाहन जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य डॉ. विलास पाटील यांनी केले.शाहूपुरी येथील एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल मैदान येथे माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद व एम. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूल यांच्यातर्फे आयोजित ४३ व्या कोल्हापूर शहरस्तरीय विज्ञान प्रदर्शनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद (माध्यमिक) विभागाचे शिक्षणाधिकारी किरण लोहार होते.डॉ. पाटील म्हणाले, आजच्या युगात ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज आहे. संपत्तीपेक्षा विद्वत्तेला सलाम केला जातो. विज्ञानामुळे माणूस जवळ आला; पण माणूसपण दूर गेले आहे. त्यामुळे विज्ञानाला धर्माची जोड देणे गरजेचे आहे. स्वत:मधील अंत:प्रेरणा जागृत करणे गरजेचे आहे. प्रत्येकाच्या मनात सतत नवीन शिकण्याचा ध्यास असला पाहिजे. अंत:प्रेरणा जागी झाली तरच योग्य शोध लागतील.यंदाच्या विज्ञान प्रदर्शनाचा ‘शाश्वत विकासासाठी नावीन्यपूर्ण उपक्रम’ हा विषय आहे. प्रदर्शनाचे उद्घाटन माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आले.

या प्रदर्शनात प्राथमिक शाळेतील १३५, तर माध्यमिक शाळेतील १३० उपकरणांचा समावेश आहे. तसेच शिक्षकांच्या १३ उपकरणांचा सहभाग आहे. सौरऊर्जेवर चालणारी गाडी, ध्वनिप्रदूषण रोखणारा जॅमर, सोलर हिटर अशा विविध प्रकाराची उपकरणे यामध्ये मांडण्यात आली आहेत. हे प्रदर्शन गुरुवार (दि. १४)पर्यंत खुले राहणार आहे.

भक्ती फट्टे, रुपाली नलवडे यांनी सूत्रसंचालन केले. प्रभारी उपशिक्षणाधिकारी (माध्यमिक) आर. व्ही. कांबळे यांनी प्रास्ताविक केले, तर एस. एस. पटेल इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका दीपाली सावंत यांनी आभार मानले. यावेळी गुजराती मित्र मंडळाचे चेअरमन जसवंतभाई शहा, विज्ञान समितीचे अध्यक्ष एम. एस. शिंदे, विज्ञान समिती सचिव प्रकाश सुतार यांच्यासह विद्यार्थी, शिक्षक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

 

टॅग्स :kolhapurकोल्हापूरscienceविज्ञानSchoolशाळा