हणबरवाडीत विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू
By Admin | Updated: June 13, 2017 16:28 IST2017-06-13T16:28:13+5:302017-06-13T16:28:13+5:30
विद्युत मोटर बसवित असताना धक्का

हणबरवाडीत विजेचा धक्का बसून तरुणाचा मृत्यू
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १३ : हणबरवाडी (ता. करवीर) येथे पाण्याच्या चावीला चालु स्थितीत विद्युत मोटर बसवित असताना विजेचा धक्का बसून तरुणाचा जागीचा मृत्यू झाला. सागर मधुकर पाटील (वय ३७) असे त्याचे नाव आहे. मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास ही घटना घडली.
अधिक माहिती अशी, सागर पाटीलचे दहावीपर्यंत शिक्षण झाल्याने तो शेती करीत होता. भाजीपाला विक्रीचा व्यवसायही करीत होता. मंगळवारी सकाळी पाणी आल्याने घरासमोरील चावीला विद्युत मोटर बसवित असताना विजेचा धक्का बसून त्याचा जागीच मृत्यू झाला. घरातील लोकांनी आरडाओरड केल्यानंतर विजप्रवाह बंद करुन सागरचा मृतदेह बाजूला घेतला.
गावचे सरपंच चंद्रकांत कद्रे व अरुण पाटील यांनी मृतदेह सीपीआरमध्ये आनला. डोळ्यासमोर पतीचा मृत्यू झाल्याने पत्नीला मानसिक धक्का बसला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा असा परिवार आहे. एकुलत्या मुलाचा मृतदेह पाहून आई-वडीलांनी व नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता. याबाबत करवीर पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे. (प्रतिनिधी)