तेरणी-बसर्गेत वीज वितरण महाकृषी अभियान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:23 IST2021-03-25T04:23:00+5:302021-03-25T04:23:00+5:30
यावेळी दोन्ही गावांतील ४५ शेतकरी ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे ७ लाखांची थकबाकी जमा केली. या योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा वृक्षरोप व ...

तेरणी-बसर्गेत वीज वितरण महाकृषी अभियान
यावेळी दोन्ही गावांतील ४५ शेतकरी ग्राहकांनी उत्स्फूर्तपणे ७ लाखांची थकबाकी जमा केली. या योजनेतून लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांचा वृक्षरोप व प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला.
वीज वितरण आर्थिक संकटाचा सामना करत आहे. मीटर नादुरुस्त चुकीचे रीडिंग या तांत्रिक समस्या सोडवल्या जावू शकतात. त्यासाठी ग्राहकांनी समोर आले पाहिजे. कोणत्याही शेतकऱ्याचे नुकसान होऊ नये हे ‘महावितरण’चे ध्येय आहे, असे प्रतिपादन प्रभारी कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी केले.
स्वप्निल सदामते यांनी प्रास्ताविक केले. यावेळी सरपंच मोसीम मुल्ला, बसर्गेचे सरपंच भारती रायमाने आदींसह पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते.
----------------------
फोटो ओळी : तेरणी (ता. गडहिंग्लज) येथील महाकृषी अभियानात महावितरणचे प्र. कार्यकारी अभियंता संजय पोवार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी सरपंच मोसीम मुल्ला, विजय शेरवी आदी उपस्थित होते.
क्रमांक : २४०३२०२१-गड-०३