शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
5
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
6
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
7
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
8
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
9
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
10
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
11
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
12
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
13
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
14
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
15
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
16
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
17
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
18
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
19
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
20
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...

सहकारी संस्थांच्या निवडणुकांचा पंधरा दिवसच धुरळा, आजपासून प्रक्रिया सुरू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 12:41 IST

विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेत पुन्हा अडकणार

कोल्हापूर : पावसाळ्यामुळे तीन महिने लांबणीवर पडलेल्या सहकारी संस्थांच्या निवडणुका आज, मंगळवारपासून सुरू करण्याचे आदेश राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने सहकार विभागाला दिले आहेत. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता पाहता निवडणुकांचा धुरळा पंधरा दिवसच उडणार, हे निश्चित आहे.काेरोनापासून सहकारी संस्थांच्या निवडणुकांचे वेळापत्रक बिघडले आहे. कोरोनानंतर निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली, पण वेगवेगळ्या कारणाने लांबणीवर टाकल्या गेल्या. ऑक्टोबर २०२३ नंतर निवडणूक घेण्याचे आदेश प्राधिकरणाने दिले हाेते. या कालावधीत काही संस्थांच्या निवडणुका होऊन गेल्या, पण तोपर्यंत लाेकसभा निवडणुकीची आचारसंहिता तब्बल दोन महिने राहिली. जूनच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता संपली आणि प्रक्रिया सुरू केली, तोपर्यंत पावसाळ्याचे कारण पुढे करत ३० सप्टेंबर पर्यंत निवडणुका लांबणीवर टाकल्या.आजपासून स्थगित प्रक्रिया नव्याने सुरू होत आहे, पण साधारणत: १५ ऑक्टोबरला आचारसंहिता लागण्याची शक्यता असल्याने निवडणुकांचा धुरळा पंधरा दिवसच उडणार आहे.संचालक मंडळाची मुदत संपलेल्या संस्था :

‘ब’ वर्ग : १७३‘क’ वर्ग : २,३८२‘ड’ वर्ग (दुग्ध) : २७५‘ड’ वर्ग (इतर) : १,०९५

अडीच-तीन वर्षे मुदतबाह्य संचालक मंडळजिल्ह्यातील काही संस्थांच्या निवडणुकाच न झाल्याने तिथे अडीच-तीन वर्षे मुदत संपलेले संचालक मंडळ सध्या कार्यरत आहे.‘ड’ वर्गातील संस्थांचा कार्यक्रम सुरू राहणार?सहकारी संस्थांच्या निवडणुकांना सतत स्थगिती दिल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याच्या तक्रारी प्राधिकरणाकडे आल्या आहेत. गेल्या आठवड्यात सहकार विभागाच्या बैठकीत आचार संहिता सुरू झाली, तरी कमी सभासद संख्या असलेल्या ‘ड’ वर्गातील संस्थांचा कार्यक्रम सुरू ठेवण्याबाबत गांभीर्याने विचार असल्याचे समजते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरElectionनिवडणूक 2024