इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:18 IST2021-06-28T04:18:31+5:302021-06-28T04:18:31+5:30

इचलकरंजी : येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व ...

Elections of NCP office bearers in Ichalkaranji | इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

इचलकरंजीत राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी

इचलकरंजी : येथील राष्ट्रवादी कॉँग्रेस पार्टीच्या इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व सेवा दलाचे अध्यक्ष बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते निवडीची पत्रे देण्यात आली. यावेळी माजी आमदार अशोक जांभळे उपस्थित होते. या निवडीच्या कार्यक्रमप्रसंगी पाटील यांनी, राष्ट्रवादी पक्षाला उभारी मिळणार हे निश्चित असून पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी येणा-या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जोमाने कामाला लागावे. नवीन नेतृत्वाने संघटना मजबूत करावी, असे आवाहन केले.

निवडीमध्ये नितीन जांभळे (अध्यक्ष), सुशीलकुमार आरेकर, नितीन क्षीरसागर, रमेश खांडेकर, सुरेश जाधव, शिवाजी शिंदे (उपाध्यक्ष), दादासाहेब पाटील (कार्याध्यक्ष), तुकाराम पाटील, भाऊसाहेब कुंभार, रियाज मुल्ला, राहुल चोथे, महेश घाटगे, सुरेश गंथडे, नासिर अपराध (सरचिटणीस), हरिबा पाटील, मनोज नंदूरकर, राजू खराडे, बाळू मुजावर, फैय्याज मुल्लाणी, आनंदा वाझे, आनंदा काटकर (संघटक सचिव), राहुल माळी, रमेश घाटगे, दत्तात्रय घोरपडे, विलास टकले, जनार्दन गोडसे, मनोज पाटील, आनंदा पोवार (चिटणीस), प्रवीण खाडे (खजिनदार), संतोष सातपुते, किसन कोरवी, श्रीकांत मांगलेकर, दिगंबर सातपुते, सचिन देवमोरे, सागर खराडे, शिवाजी सातपुते, शिवाजी पाटील, उत्तम खामकर, राहुल पाटील, सागर जोंधळे, नीलेश नाईक, विक्रम देसाई, प्रवीण देसाई, पंकज कराळे, मीरासाब शेख, उमेश डाके, अमर लोकरे, संदीप पाटील, अनोज राजमाने, राकेश डाफळे, संजय बडवे (कार्यकारिणी सदस्य), संदीप पाटील (शहर अध्यक्ष व उद्योग विभाग).

महिला कार्यकारिणीमध्ये रंजना बंडगर (अध्यक्षा), सिंधूताई महाजन (कार्याध्यक्षा), सीमा घोरपडे, संगीता चौगुले, बानूबी पठाण, फुलावती खामकर (उपाध्यक्षा), अर्चना नागटिळक, शैनाज सय्यद, रिहाना मुल्ला (सरचिटणीस), आशा भोगे, हिन्जा चोकावे, सपना आवळे, मिनाज शेख (संघटक सचिव), काजल आवळे (खजिनदार), सुप्रिया चिले, दीपाली बनसोडे, रूपाली कांबळे, सपना पोतदार, अनिता जाधव, विद्या झेंडे, गीता मांगले, मल्लाक्का कांबळे (कार्यकारी सदस्या) यांचा समावेश आहे. यावेळी नगरसेवक राजवर्धन नाईक, राजू खोत, निहाल कलावंत, आदी उपस्थित होते.

फोटो ओळी

२७०६२०२१-आयसीएच-०१

इचलकरंजीत राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील व बाळासाहेब देशमुख यांच्या हस्ते पत्र देण्यात आले.

Web Title: Elections of NCP office bearers in Ichalkaranji