चार सूतगिरण्यांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार
By Admin | Updated: January 9, 2015 00:11 IST2015-01-08T23:35:37+5:302015-01-09T00:11:56+5:30
मतदारयाद्यांचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नुकताच जाहीर

चार सूतगिरण्यांच्या निवडणुका फेब्रुवारीत होणार
कोल्हापूर : जिल्ह्यातील चार सहकारी सूतगिरण्यांच्या निवडणुका पुढील महिन्यात (फेब्रुवारी) होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. याबाबतचा प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी नुकताच जाहीर केला आहे. आजरा, इचलकरंजी, शिरोळ, पन्हाळा येथील गिरण्यांचा यामध्ये समावेश आहे.जिल्ह्यातील अण्णा-भाऊ आजरा सहकारी सूतगिरणी (ता. आजरा), महेश सहकारी सूतगिरणी (इचलकरंजी), केदारलिंग वारणा सहकारी सूतगिरणी, आसुर्ले-पोर्ले (ता. पन्हाळा), देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार शिरोळ मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी (ता. शिरोळ) या गिरण्यांच्या प्रारूप मतदारयाद्यांचा कार्यक्रम जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक उपसंचालक वस्त्रोद्योग (सोेलापूर) श्रीकांत मोरे यांनी जाहीर केला आहे. यामध्ये देशभक्त रत्नाप्पाण्णा कुंभार सूतगिरणीचा मतदारयादी कार्यक्रम २ जानेवारीला प्रसिद्ध करण्यात आला आहे. यासाठी ११ जानेवारी ही हरकत घेण्याचा अंतिम दिनांक असणार आहे. अंतिम मतदार यादी २७ जानेवारीला प्रसिद्ध केली जाणार आहे. उर्वरित वरील तीन सूतगिरण्यांच्या मतदारयाद्यांचा कार्यक्रम आज, गुरुवारी जाहीर करण्यात आला. १७ जानेवारीपर्यंत यावर हरकती घेण्याची मुदत आहे. अंतिम मतदारयादी ३१ जानेवारीला प्रसिद्ध होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती या महिनाअखेर होण्याची शक्यता आहे. या अधिकाऱ्यांची नेमणूक राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण (पुणे)कडून होणार आहे. (प्रतिनिधी)