‘गाेकुळ’, केडीसीसीसह ५९४ संस्थांच्या निवडणुका पुन्हा लाबंणीवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:22 IST2021-01-17T04:22:09+5:302021-01-17T04:22:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्यशासनाने शनिवारी घेतला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ...

‘गाेकुळ’, केडीसीसीसह ५९४ संस्थांच्या निवडणुका पुन्हा लाबंणीवर
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा लांबणीवर टाकण्याचा निर्णय राज्यशासनाने शनिवारी घेतला. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील ‘गोकुळ’, ‘केडीसीसी’सह ५९४ संस्थांच्या निवडणुका ३१ मार्चपर्यंत पुढे गेल्या आहेत. त्यामुळे उद्या, सोमवारपासून प्रारूप मतदार याद्यांची सुरू केलेली प्रक्रिया थांबविण्यात आली आहे.
महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना व त्यानंतर कोरोनामुळे राज्यातील सहकारी संस्थांच्या निवडणुका लांबणीवर टाकल्या होत्या. राज्य शासनाने डिसेंबर २०२० अखेर निवडणुकांना मुदतवाढ दिली होती. ही मुदत संपल्याने निवडणुकीच्या हालचाली सुरू झाल्या, सहकारी संस्था निवडणूक प्राधीकरणाने निवडणुकांची तयारीही सुरू केली होती. त्यानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील ५९४ संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया सुरू झाली होती. उद्या, सोमवारपासून प्रारूप मतदार याद्या प्रसिध्द होणार होत्या. केडीसीसी बँकेचे ठरावही गोळा करण्याची प्रक्रिया सुरू झाली होती.
तोपर्यंत शनिवारी राज्य शासनाने निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. नैसर्गिक आपत्तीमध्ये जनहिताच्या दृष्टीने सहकारी संस्थांच्या निवडणुका एक वर्षाहून अधिक असणार नाहीत, इतक्या कालावधीसाठी पुढे ढकलता येतात. त्यानुसार १७ मार्च २०२१ ला वर्ष पूर्ण होते. त्यामुळे ३१ मार्च २०२१ पर्यंत निवडणुका लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला. ३१ मार्चनंतर ज्या टप्प्यावर निवडणुका स्थगित करण्यात आलेल्या आहेत, त्या टप्प्यावरून नव्याने सुरू करण्यात येणार आहेत.