कागलमधील ३५ संस्थांच्या निवडणुका
By Admin | Updated: December 16, 2014 23:52 IST2014-12-16T22:53:42+5:302014-12-16T23:52:33+5:30
‘क’ वर्गातील संस्थां : काही संस्थांची निवडणूक प्रक्रिया सुरू

कागलमधील ३५ संस्थांच्या निवडणुका
कागल : कागल तालुक्यातील ‘क’ वर्गातील ३५ सहकारी संस्थांचा निवडणूक कार्यक्रम घोषित झाला असून, काही संस्थांची निवडणूक प्रक्रियाही सुरू झाली आहे. यामध्ये सेवासंस्था, पतसंस्था, औद्योगिक ग्राहक आणि पाणीपुरवठा संस्थांचा समावेश आहे. याबद्दलची माहिती संबंधित संस्था आणि येथील सहायक निबंधक कार्यालयात उपलब्ध आहे.
३१/३/२०१३ पर्यंतच्या पात्रता तारखेपर्यंतच्या या संस्था आहेत. त्यामध्ये सर्वच ३५ संस्थांच्या निवडणुका एकदम होणार नाहीत. त्या टप्प्याटप्प्याने घेतल्या जाणार आहेत. करनूर (ता. कागल) येथील शेतकरी विकास सेवा संस्था, शाहू विकास सेवा संस्था केनवडे, स्वामी समर्थ शेंडूर या सेवा संस्थांचा निवडणूक कार्यक्रम प्रत्यक्षात सुरू झाला आहे. २२ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करणे, ३१ डिसेंबर २०१४ ते १५/१/२०१५ पर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेणे, तर २४ जानेवारीला मतदान अशा तारखा आहेत.
निवडणूक कार्यक्रमासाठी सज्ज झालेल्या आणि काहींची निवडणूक लागलेल्या संस्था पुढीलप्रमाणे :- दत्त विकास जैन्याळ, दत्तपंत लिंगनूर कापशी, विठ्ठल रखुमाई कासारी, राम विकास संस्था बाळिक्रे, विठ्ठल अवचितवाडी, सदाशिवराव मंडलिक हळदी, नवनाथ आणूर, भावेश्वरी पतसंस्था बिद्री, प्रथमेश पतसंस्था कसबा सांगाव, साईनाथ पतसंस्था वाळवे खुर्द, वेदगंगा पतसंस्था मळगे खुर्द, कागल तालुका शिक्षक पतसंस्था, मंडलिक साखर कारखाना कामगा पतसंस्था, कागल नगरपालिका नोकर पतसंस्था, दूधगंगा ग्राहक सांगाव, इंदिरा महिला मुरगूड, दत्त ग्राहक सांगाव, रत्नछाया पाणी पुरवठा कसबा सांगाव,
जगदंबा पाणी पुरवठा मांगनूर,
सर पिराजीराव गूळ उत्पादक संस्था मुरगूड, आदींचा यामध्ये समावेश आहे.
बिनविरोधसाठी हालचाली
प्रामुख्याने विकास आणि पतसंस्था बिनविरोध करण्यासाठी सत्ताधारी मंडळीकडून आता हालचाली सुरू आहेत. एकमताने बिनविरोध झाली, तर चांगलेच आहे; पण निवडणूक कार्यक्रमच गुपचुपपणे उरकून संस्था बिनविरोध करून घेण्याचे प्रकार कागल तालुक्यात नवीन नाहीत. यासाठी संस्थेच्या सभासदांनी जागरूक राहून निवडणूक कार्यक्रमाकडे लक्ष द्यावे.