जिल्हा परिषद अध्यक्ष निवड उद्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:18 IST2021-07-11T04:18:13+5:302021-07-11T04:18:13+5:30
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड उद्या सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पीठासन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी ...

जिल्हा परिषद अध्यक्ष निवड उद्या
कोल्हापूर : जिल्हा परिषदेच्या नव्या अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड उद्या सोमवारी होणार आहे. या पार्श्वभूमीवर पीठासन अधिकारी अप्पर जिल्हाधिकारी किशोर पवार यांनी शुक्रवारी सभागृहाची पाहणी केली.
जिल्हा परिषदेच्या राजर्षी शाहू छत्रपती सभागृहात ही निवड होणार आहे. सकाळी ११ ते १ या वेळेत नामनिर्देशनपत्रे स्वीकारण्यात येणार असून त्यानंतर सभा सुरू होईल. छाननी झाल्यानंतर माघारीसाठी १५ मिनिटे देण्यात येतील. गरज पडल्यास प्रत्यक्ष मतदान घेण्यात येईल. सदस्यांना सभागृहात सोडताना त्यांचा ताप आणि ऑक्सिजन पातळी तपासण्यात येणार आहे.
सभागृहात इतर कोणाला प्रवेश नसल्याने कोरोनाचे नियम पाळण्यासाठी अंतर राखून बैठक व्यवस्था करण्यात आली आहे. हात वर करून मतदान असल्याने संबंधित सदस्यांचे मतदान मोजून ते नोंदवण्यासाठीच्या मनुष्यबळाचे नियोजन केले असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा देसाई यांनी सांगितले.
चौकट
पदाधिकाऱ्यांच्या दालनाची स्वच्छता
पदाधिकाऱ्यांना राजीनामा दिल्यानंतर त्यांची दालने फारशी वापरात नव्हती. त्यामुळे गेल्या चार दिवसात या दालनांची स्वच्छता करण्यात आली आहे. कुशन कव्हरपासून स्वच्छता करण्यात आली असून सोमवारी अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि मंगळवारी अन्य चार पदाधिकाऱ्यांच्या निवडी होणार आहेत. त्यामुळे सर्व दालनांची स्वच्छता करण्यात आली.