उल्हास भोसले यांची अध्यक्षपदी निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 04:15 IST2021-07-05T04:15:50+5:302021-07-05T04:15:50+5:30
मलकापूर : शाहूवाडी तालुका भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी उल्हास शंकर भोसले यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण नाना म्हावळे यांची ...

उल्हास भोसले यांची अध्यक्षपदी निवड
मलकापूर : शाहूवाडी तालुका भारतीय मराठा महासंघाच्या अध्यक्षपदी उल्हास शंकर भोसले यांची तर उपाध्यक्षपदी प्रवीण नाना म्हावळे यांची निवड करण्यात आली. निवडीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा उपाध्यक्ष उदयसिंह खोत होते.
निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांची नावे अशी, सचिव अनिल वीर, खजिनदार तानाजी शिंदे, संपर्क प्रमुख अरविंद म्हावळे, वैभव गांधी, आनंदा पाटील, माजी सरपंच गणेश पाटील, अनंत पाटील, अजय पाटील, अजिंक्य विभुते, शहाजी शेलार, महिपती बागम, नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार उदयासिंह खोत, अनंत पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. मराठा आरक्षणासाठी तालुक्यात जनजागृती करणार असल्याचे खोत यांनी सांगितले.
फोटो ०४ उल्हास भोसले
०४ प्रवीण म्हावळे